ETV Bharat / state

गर्भवती व दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्या; ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधीत आजार, हृदयविकार, श्वसनविकार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी आणि गर्भवती कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Yashomati Thakur
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Jul 4, 2020, 7:03 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधीत आजार, हृदयविकार, श्वसनविकार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी आणि गर्भवती कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने अॅड. ठाकूर यांना एक निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोविड-19 चा संसर्ग होऊन स्वत:ला आणि बाळाला धोका पोहचू नये, यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. लॉकडाऊन काळात वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणेही शक्य झालेले नाही. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस व श्वसनशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोविड संसर्गातून धोकादायक स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी, अशी विनंती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

खूपच अत्यावश्यक काम असेल तर या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करू देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा. तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.