मुंबई - प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे आज पहाटे अमेरिकेत निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीतील अनेक उत्तम पुस्तकांचे लेखन आणि संपादन त्यांनी केले.
त्यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित 'नागरिक' हा मराठी सिनेमा 2014 साली आला होता. तर त्यांच्याच 'हुतात्मा' या कादंबरीवर आधारित याच नावाची एक वेबसिरीज गेल्यावर्षी दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी 'झी फाईव्ह' या डिजिटल अॅपसाठी बनवली होती. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त लेखिका हरपल्याची भावना मराठी साहित्य वर्तुळातून व्यक्त होते आहे.
मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा -
आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
मॅरिलीन मन्रो (अनुवादित कादंबरी)
मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
ये तारुण्या ये (कथासंग्रह)
हुतात्मा (कादंबरी)
ज्येष्ठ लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे अमेरिकेत निधन
मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे आज पहाटे अमेरिकेत निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.