ETV Bharat / state

राज्यातील सर्वात मोठी माथाडी कामगार संघटना फुटीच्या वाटेवर? - narendra patil

माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे हे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे या दोघांमधले वाद विकोपाला गेले आहेत.

माथाडी कामगार मेळावा
author img

By

Published : Mar 24, 2019, 8:50 AM IST

Updated : Mar 24, 2019, 10:14 AM IST

मुंबई - माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी नवी मुंबईत दरवर्षी प्रमाणे माथाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या मेळाव्याला शनिवारी एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बोलाविण्यात आले नाही. दरवर्षी शरद पवार किंवा मुख्यमंत्र्यांना आवर्जून बोलावले जायचे. पण, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वारंवार पक्ष बदलामुळे कोणत्या नेत्यांना बोलवायचे याबाबत गोची झाल्याने प्रथमच माथाडी मेळाव्याला कोणीही मोठे नेते उपस्थित नव्हते.

माथाडी नेते नरेंद्र पाटील

राज्यातील माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळख असलेले नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचा झेंडा हातात असताना भाजपची माळ गळ्यात घ्यायला उत्सुक होते. यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद देखील स्वीकारले. पण, त्यांना अचानक शिवसेनेचा झेंडा हातात घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांची अवस्था "जाना था जापान पहुच गए चीन" अशी झाले आहे. याचेच सावट आज झालेल्या माथाडी मेळाव्यात दिसून आले.माथाडी नेते आचारसंहितेचे कारण सांगत असले तरी यामागे वेगळेच कारण आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे हे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे या दोघांमधले वाद विकोपाला गेले आहेत. राज्यातील सर्वात मोठी माथाडी संघटना फुटीच्या वाटेवर होती, त्यातच नरेंद्र पाटील भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवणार, असे असताना त्यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मग कोणत्या नेत्यांना बोलवायचे आणि बोलवले तर संघटनेत फूट ही खरी गोची झाली होती, म्हणुन आचारसंहितेचे कारण या नेत्यांनी पुढे केले. पण याआधी देखील भर निवडणुकीत हेच मेळावे मोठ्या नेत्यांच्या हजेरीने पार पडलेत आणि ते मेळावे गाजले देखील आहेत.

मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीका केली होती. तर लगेच नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली. यामुळे ही संघटना फुटीच्या वाटेवर असल्याचे चित्र होते. आजच्या मेळाव्यात पक्ष बाजूला ठेऊन फक्त संघटनेसाठी एकत्र येऊन काम करायचे, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले. मात्र, नरेंद्र पाटील यांनी पक्ष कुठलाही असू देत पण मी साताऱ्याला निवडणूक लढविल्यास माथाडी कामगारांनी मला मत द्यावी, असे आवाहन मेळाव्यात केले. यामुळे आता साताराऱयातील माथाडी वर्ग शशिकांत शिंदे की नरेंद्र पाटील यांच्या पारड्यात मत टाकेल हा येणारा काळच ठरवेल.

कै.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज नवी मुंबईत माथाडी कामगारांचा मेळावा, मेळाव्याला एकाही दिग्गज नेत्याला निमंत्रण नाही, वारंवार पक्ष बदलामुळे कोणत्या नेत्याला बोलवायचे यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची गोची. 

Anchor-: माथाडी नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज नवी मुंबई मद्ये दरवर्षी प्रमाणे माथाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या मेळाव्याला आज एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बोलावण्यात आले नाही, दरवर्षी शरद पवार नाही तर मुख्यमंत्र्याना आवर्जून बोलावले जायचे पण माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वारंवार पक्ष बदलामुळे कोणत्या नेत्यांना बोलवायचे याबाबत या नेत्याची गोची झाली आणि यावर्षी प्रथमच माथाडी मेळाव्याला कोणीही मोठे नेते उपस्थित नव्हते.

Vo1-: राज्यातील माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळख असलेले नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचा झेंडा हातात असताना भाजपची माळ गळ्यात घ्यायला उत्सुक होते, यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अद्यक्षपद देखील स्वीकारले पण त्यांना अचानक शिवसेनेचा झेंडा हातात घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांची अवस्था "जाना था जापान पहुच गये चीन" अशी झालेय. याचेच सावट आज झालेल्या माथाडी मेळाव्यात दिसून आले,  हे नेते भले आचारसंहितेचे कारण  सांगत असतील पण खरे कारण वेगळेच आहे,  माथाडी नेते असेलेले , नरेंद्र पाटील आणि शशिकांत शींदे हे वेगवेगळ्या पक्षात आहेत ,यामुळे या दोघांमधले वाद विकोपाला गेलेत. यामुळे राज्यातील सर्वात मोठी माथाडी संघटना फुटीच्या वाटेवर होती, त्यातच नरेंद्र पाटील भाजप च्या तिकीटावर लोकसभा  लढवणार असे असताना त्यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मग कोणत्या नेत्यांना बोलवायचे  आणि बोलवले तर संघटनेत फूट ही खरी गोची झाली. म्हणून आचारसंहितेचे कारण या नेत्यांनी पुढे केलेय. पण याआधी देखील भर निवडणुकीत हेच मेळावे मोठ्या नेत्यांच्या हजेरीने पार पडलेत आणि ते मेळावे गाजले देखील आहेत.

Byte-: नरेंद्र पाटील [ माथाडी नेते ] 

Vo2-: गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी चे आमदार शशिकांत शींदे यांनी सरकार वर टीका केली होती, तर लगेच नरेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन शशिकांत शींदे यांच्यावर टीका केली. यामुळे ही संघटना फुटीच्या वाटेवर असल्याचे चित्र होते. आजच्या मेळाव्यात पक्ष बाजूला ठेऊन फक्त संघटनेसाठी एकत्र येऊन काम करायचे असे आवाहन शशिकांत शिन्दे यांनी केले मात्र नरेंद्र पाटील यांनी मात्र पक्ष कुठलाही असू देत पण मी साताऱ्याला निवडणूक लढविल्यास माथाडी कामगारांनी मला मत द्यावी असे आवाहन आजच्या  मेळाव्यात केले. यामुळे आता सातारा मधील माथाडी वर्ग शशिकांत शिन्दे की नरेंद्र पाटील यांच्या पारड्यात मत टाकेल हा येणारा कालच ठरवेल.

Feed send what’s app

Pls check it
Last Updated : Mar 24, 2019, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.