नवी मुंबई : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 70 वर्षे वृद्धाला त्याच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ व फोटो (case of sextortion) पाठवून एका महिलेने जाळ्यात (woman has cheated an old woman) ओढले. सेक्सस्टाॅर्शनच्या प्रकरणात 70 वर्षीय वृद्धाला एका महिलेने तब्बल सव्वा दोन लाखांचा गंडा (lakhs of rupees in case of sextortion) घातला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार (complaint filed in Panvel city police station) दाखल झाली आहे.
मोबाईलवर पाठवले अश्लील व्हिडिओ: पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 70 वर्षे वृद्धाला त्याच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ व फोटो पाठवून एका महिलेने जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याच्याकडून ब्लॅकमेल करून तब्बल सव्वा दोन लाख रुपये उकळले, मात्र पैसे घेऊनही संबंधित महिलेचे ब्लॅकमेलिंग करने थांबत नव्हते.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल: पैसे देऊनही वारंवार पैशाची मागणी करत ब्लॅकमेलिंग होत असल्याचे पाहून, सत्तर वर्षीय वृद्धाला त्याची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्याने तडक पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा नवी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत. या अगोदरही नवी मुंबई परिसरात सेक्सस्टाॅर्शच्या घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये नवी मुंबई परिसरात दिवसागणिक वाढ होत आहे.