मुंबई - मुंबईतील एका युवतीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्कारचा आरोप केला आहे. तसेच तिला मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही तिने म्हटले आहे. यासंदर्भात युवतीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे.
हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची केली मागणी -
बॉलीवुडमध्ये काम करणाऱ्या एका युवतीने हेमंत सोरेन यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हेमंत सोरेन यांनी 5 सप्टेंबर 2013 रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, असेही तीने म्हटले आहे. यासंदर्भात तिने वांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवली असून महाराष्ट्र सरकारने याची सीबीआई चौकशीही करावी, अशी मागणी तिने केली. दरम्यान, तीची एक चिठ्ठी सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तिने हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच याची निष्पक्ष चौकशी न केल्यास देशातील महिलांवरील अत्याचार थांबणार नाही, असेही तिने या चिठ्ठीत म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल -
या घटनेच्या 45 दिवसांनंतर युवतीने या घटनेची तक्रार मुंबईच्या एका मेट्रोपोलिटन कोर्टात केली होती. परंतु त्याच्या नऊ दिवसांनंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. हेमंत सोरेन त्यावेळी झारखंडचे मुख्यमंत्री होते. आता त्या युवतीची 8 डिसेंबर 2020 ची एक चिठ्ठी सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात बोलताना मुंबईचे झाेन-9 चे डीसी अभिषेक त्रिमुखे यांनी या घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने या पत्राच्या आधारे महाराष्ट्राच्या डीजीपीकडून यांसंर्भात माहिती मागितली आहे.
हेही वाचा - देशातील पहिली 'चालकरहीत' मेट्रो! मोदींनी दिल्लीत दाखवला हिरवा झेंडा