ETV Bharat / state

Woman Burnt Body Found: जळालेल्या अवस्थेत तीन तुकड्यांमध्ये गोणीत सापडला महिलेचा मृतदेह - महिलेचा जळालेला मृतदेह आढळला

Woman Burnt Body Found: मुंबईत वडाळा रेल्वे बीपीटी गेट नंबर चार आणि पाचच्या मध्ये ओव्हर हेड इलेक्ट्रिक वायर पोलच्या जवळ असलेल्या चिंदी गल्लीच्या मागे एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत तीन तुकड्यांमध्ये गोणीत मृतदेह काल (गुरुवारी) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Woman body found in three pieces) याप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman Burnt Body Found
गोणीत सापडला महिलेचा मृतदेह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 10:26 PM IST

मुंबई Woman Burnt Body Found: काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास मालगाडीच्या डब्यांचे इन्स्पेक्शन म्हणजेच पाहणी करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक बीपीटी रेल्वे ट्रॅकच्या भागात गेले होते. यावेळी त्यांना एका गोणीमध्ये एका ३५ ते ५० वयोगटातील महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले होते. मृत महिला पूर्णतः जळालेल्या अवस्थेत आहे. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमृता गारुळे या करत आहेत. दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आल्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (female murder case Mumbai)

डोक्यावर हत्याराने वार नंतर जाळला महिलेचा मृतदेह: २६ ऑक्टोबरला दुपारी 12:15 वाजण्यापूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अंदाजे वय 35 ते 45 वयाच्या अनोळखी महिलेच्या डोक्यावर हत्याराने वार केला. यानंतर तिला रेल्वे बीपीटी गेट नंबर चार व पाचच्या मध्ये ओव्हर हेड इलेक्ट्रिक वायर एमबीपीटी क्रमांक रेल्वे पटरीवर चिंदी गल्लीतील एका क्लिनिक मागे असलेल्या निर्जन स्थळी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक म्हामुणकर आणि ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक अमृता गारुळे, गुन्हे प्रकटीकरण पथक कोकणी खाटमोडे व पथक घटनास्थळी रवाना झाले.

तपास पथकाने गाठले घटनास्थळ: घटनास्थळी फोटोग्राफर, श्वानपथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, रासायनिक विश्लेषक यांना घटनास्थळी पाचारण केले गेले. अर्धवट जळालेले व काळे पडलेले धड आणि त्याचे अवयव हे वडाळा मोबाईल वाहनाच्या मदतीने केईएम हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. या महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीचा वडाळा पोलीस शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर दुव्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. मृतदेहावर सापडलेले काही दागिने यांच्यावरून देखील आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. अनेक भागात रेल्वे लाईनचे निर्जन स्थळ हत्या केलेल्या इसमांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारे स्थळ बनत चालले आहे. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे पोलीस पथकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

  1. MP Crime News : मध्य प्रदेशात स्फोटकानं भरलेला महाराष्ट्राचा ट्रक पकडला, अमरावती, अकोल्याच्या दोन आरोपींना अटक
  2. Lalit Patil Case Update : ड्रग्ज प्रकरणात आरोपी ललित पाटीलसह अन्य दोघांना 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
  3. Mumbai Crime News : स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा निर्जनस्थळी विनयभंग, नराधमाला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.