ETV Bharat / state

'त्या' व्यक्तीमुळे 26 नर्स, 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण; मुंबईत वॉकहार्ट रुग्णालय सील - कोरोना व्हायरस बातमी

वॉकहार्ट रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला छातीत काही त्रास होत होता. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संसर्गाने 26 नर्स आणि 3 डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे रुग्णालय पालिकेने आणि पोलिसांनी सील केले आहे.

wockhardt-hospital-seal-due-to-corona
wockhardt-hospital-seal-due-to-corona
author img

By

Published : Apr 6, 2020, 12:39 PM IST

मुंबई- मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आणि पोलिसांनी वॉकहॉर्ट रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर सील केला आहे. तर हा विभाग ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे.

हेही वाचा- 'चिनी विषाणू परत जा', लॉकडाऊनचे नियम धाब्याबर बसवून भाजप आमदाराची घोषणाबाजी

वॉकहार्ट रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला छातीत काही त्रास होत होता. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संसर्गाने 26 नर्स आणि 3 डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे रुग्णालय पालिकेने आणि पोलिसांनी सील केले आहे.

रुग्णालयात आत- बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जोपर्यंत या रुग्णालयातील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे. या रुग्णालयातील 270 नर्से आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत सध्या कोरोनाचे एकूण 444 रुग्ण असून त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे एकूण 781 रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.