मुंबई - परराज्यातील मजूर, कामगारांना आपल्या गावी परतण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून स्थानिक पोलीस आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी लागते. यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी मिळत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर या परवाणग्या घेण्यात अडचणी येत असलेल्या कामगारांना आता परवानगी मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ हे पुढे सरसावले आहेत. त्यांच्या मदतीने शिवसेना शाखा क्रमांक 221 येथे फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. गरजूंनी शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
हेही वाचा... कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी राज्यसरकारने परवानगीसाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. या नागरिकांची राज्यात जाण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायला लागली आहे. या मजुरांना गावी सोडण्यासाठी गाड्या सोडण्याचा निर्णय होऊन तशी अनुमती मिळाली आहे. मात्र, या गाड्या कुठून सोडल्या जात आहेत. त्याची माहिती या कामगारांना मिळत नाही. त्यांच्या मदतीसाठी शिवसेना शाखा आणि खासदार सावंत पुढे सरसावले आहेत. या मजुरांकडुन रेल्वेचे भाडे आकारले जाते, ही दुर्दैवी बाब असल्याचे अरविंद सावंत म्हणाले.