ETV Bharat / state

Narco Test : कशी करतात नार्को टेस्ट? त्यापूर्वी केली जाणारी पॉलोग्राफ तपासणी म्हणजे काय? - नार्को टेस्ट करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी

नार्को चाचणी ( Narco Test ) ही एक प्रकारची भूल असते ज्यामध्ये आरोपी पूर्णपणे सचेतन किंवा बेशुद्ध नसतो. नार्को चाचणी तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा आरोपीने चाचाणी करण्यास संमती दिली असेल. या चाचणीच्या मदतीने आरोपीच्या मनातून सत्य बाहेर काढण्याचे काम केले जाते. नार्को चाचणी मुख्यतः गुन्हेगारी प्रकरणांमध्येच ( Medical examination before narco test ) केली जाते.

कशी करतात नार्को टेस्ट
कशी करतात नार्को टेस्ट
author img

By

Published : Nov 21, 2022, 10:01 PM IST

Updated : Nov 29, 2022, 11:50 AM IST

मुंबई : पोलिसांच्या थर्ड डिग्री पुढे भलेभले गुंडाना वाचा फुटते, खरे बोलू लागतात. मात्र, पोलिसांची थर्ड डिग्री काही कसाब, आफताब सारख्या गुन्हेगारांवर फरक पडत नाही. तर, त्यासाठी त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट ( Narco Test ) केली जाते. आरोपींकडून गुन्हा कसा केला याचे मिळते जुळते धागेदोरे जुळवण्यास नार्को टेस्टमुळे मदत होते.

कशी केली जाते नार्को टेस्ट - नार्को टेस्ट ही थोड्याफार आनेस्थेशिया देतो ना ऑपरेशन करण्यापूर्वी गुंगी येण्यासाठी तशाच प्रकारची प्रक्रिया आहे. असे डहाणू येथील वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिष्ठाता डॉक्टर शुभांगी पारकर यांच्याशी ईटीव्हीशी संवाद साधतांना सांगितले. नार्को टेस्टपूर्वी पोलिग्राफ तपासणी का केली जाते.

कशी करतात नार्को टेस्ट?

आरोपीला करतात हिप्नोडाइज - सोडियम पॅंटाथाल हा एनेस्थेथिक ड्रग ( Sodium pentathal anesthetic drug ) आहे, की जो साधारणत: आपण ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णाला भूल येण्यासाठी देतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो. तशाच प्रकारे ही प्रक्रिया आहे. मात्र, नार्को टेस्टमध्ये पूर्णपणे बेशुद्ध केले जात नाही. या टेस्टमध्ये बेशुद्ध, शुद्ध या मधली अवस्था असते. हिप्नोडाइज ( Hypnotize ) किंवा संमोहनसारखी अवस्था असते. म्हणजे ती व्यक्ती पूर्ण बेशुद्ध नसते. त्याला आपण काय बोलतो, विचारतो, आपण त्याला काय प्रश्न विचारतो हे समजत असतं. पण तो गुंगीत असतो ही टेस्ट करताना जे ड्रगचे इंजेक्शन दिले जाते ते द्यायचं म्हणून दिलं जात नाही. तर त्या व्यक्तीचं वय, वजन पाहून त्या प्रमाणात ते ड्रग इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जाते.

नार्को टेस्ट करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी - ज्याची नार्को टेस्ट करायाची आहे. त्याला मेडिकल हिस्ट्री आहे का हे आगोदर पहावे लागते. त्या व्यक्तीला किडनी, लिव्हर, इतर वैद्यकीय काही त्रास आहे का याची तपासणी केली जाते. त्यानंतरच नार्को टेस्ट केली जाते. त्या व्यक्तीचे वैद्यकीय तपास व्यवस्थित केले जातात. त्यानंतर त्याच्या वजनानुसार ड्रग दिला जातो. ज्याप्रमाणे ऑपरेशन करण्यापूर्वी अनस्थेशिया दिला जातो त्याप्रमाणे नार्को टेस्टमध्ये ( Medical examination before narco test ) देखील दिला जातो. अशी माहिती डॉक्टर शुभांगी पारकर यांनी दिली.

मेंदू येतो ड्रगच्या प्रभावाखाली - प्रक्रिया सुरू असताना त्या व्यक्तीला घेऊन जातात. त्यावेळी तो किती शुद्धीत किंवा बेशुद्धीत आहे. त्यावरून ते ठरवले जाते. या प्रक्रियेला किती वेळ लागणार. सोडियम पँटाथाल हा ड्रग हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये दिला जातो, जेव्हा आपण साधारण गुंगीमध्ये असतो, तेव्हा आपण शुद्धीत असतो. तेव्हा माणूस जाणून बुजून कल्पना करेल, जाणून-बुजून खोटं सांगेल. मात्र, या स्थितीत मेंदू त्या दिशाभूल करण्याच्या स्थितीत रहात नाही. कथित कल्पना करायच्या परिस्थितीत मेंदू नसतो. कथित कल्पना साधारणतः गुन्हेगार करतात. मेंदूची तल्लखता काढून घेतली जाते. मेंदू जो तल्लक असतो तो या ड्रगच्या प्रभावाखाली कमी येतो.

मनात दडलेल्या गोष्टी येतात बाहेर - दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इन्वेस्टीगेशन यंत्रणांनी कैद्यांकडून माहिती काढून घेण्यासाठी ट्रूथ सिरम देऊन सत्य काढून घेण्याचं काम केलं होतं. हीच नार्को टेस्ट मानसिक आजार असलेले रुग्णांवर आम्ही पूर्वी अशा प्रकारे उपचार करून त्यांच्या मनात दडलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. या रुग्णांच्या मनातील खूप अवघड असते. आता आम्ही या टेस्टचा वापर या रुग्णांसाठी करत नाही. काही टेस्ट करत असताना अनेस्थेशियाचे डॉक्टर, तज्ञाची टीम असते. ते वारंवार पल्स रेट, हार्ट रेट त्यावर लक्ष ठेवून असतात.

नार्को टेस्ट केल्यावर देखील सत्य काय आहे सांगणे कठीण - टेस्ट करतांना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीची नार्को टेस्ट करणार आहे त्या व्यक्तीची देखील परवानगी घ्यावी लागते. जबरदस्तीने एखाद्या गुन्हेगाराकडून अशी माहिती काढू शकत नाही. मात्र, आफताबने केलेला गुन्हा फार निर्घृण, क्रूर असल्याने जर तो पोलिसांना मिस गाईड करत असेल ही टेस्ट केली जाणे योग्य आहे. त्या टेस्ट मधून तो पूर्णपणे सत्यच सांगेल याची खात्री देता येत नाही. मात्र गुन्हेगाराच्या बोलण्यातून अंदाज घेऊन त्याच्या आजूबाजूचे काही धागेदोरे मिळतात का त्यासाठी देखील याचा वापर होतो.

पोलिग्राफ टेस्टमधून शरीरातील बदल समजतात - एखादा माणूस खोटं बोलतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. खोटे बोलताना झालेले शरीरात झालेले बदल कळतात. त्यावेळी तुमचे पल्स रेट, हार्ट रेट वाढतात त्यात बदल होतो. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. हेच पोलिग्राफ टेस्टमधून कळून येतं. पॉलोग्राफमध्ये आपल्या शरीरात झालेल्या बदलामुळे पल्स रेट, हार्ट रेट हे स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे नार्को टेस्ट करण्यापूर्वी पॉलीग्राफ तपासणी देखील केली जाते. इसीजी करताना ज्याप्रमाणे हातापायांच्या बोटांना यंत्रणा लावतात.

ड्रगची मात्रा जास्त झाल्यास जीवाला धोका - त्याचप्रमाणे पॉलीग्राफमध्ये देखील लावतात. तसेच नार्को टेस्ट करताना अतिशय तज्ञ डॉक्टरांची टीम तेथे उपस्थित असते. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सारख्या सर्व उपकरणांची देखील तेथे व्यवस्था करण्यात येते. कारण दिल्या जाणाऱ्या ड्रगची मात्रा जास्त झाल्यास ती व्यक्ती कोमात जाऊ शकते, अन्यथा मरण देखील पाहू शकते अशी माहिती मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Last Updated : Nov 29, 2022, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.