मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांची बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेत घुसमट होत आहे. त्यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. विधान परिषदेची उमेदवारीहीत्यांना देण्यात आली नाही. या प्रकरणावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील काही नेते जाणून-बुजून विरोधात कट कारस्थान करत आहेत असे सांगत मंत्री अनिल परब हे गद्दार असून शिवसेना या गद्दारांना कसे खपवून घेते असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दापोली नगरपंचायत निवडणुक समर्थकांचा पत्ता कट
अलीकडेच परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर असताना रामदास कदम समर्थकांची शिवसेनेच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यातच काहींना नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी डावलण्यात आले. माजी आमदार सूर्यकांत दळवींच्या समर्थकांना तिकिटे देण्यात आली. ते परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे कदम संतप्त झाले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेचा मुंबईतून उमेदवार म्हणून रामदास कदम यांचा पत्ता कट करून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत केलेल्या संभाषणाची ऑडियो क्लिप उघड झाल्यानंतर दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदमांना पक्षाकडून मोठा झटका देण्यात आला. कदम यांचे पुत्र विद्यमान आमदार योगेश कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला. यामुळे दापोली शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकरणासाठी मंत्री अनिल परब हे जबाबदार असून शिवसेना संपवायचे काम सध्या ते करत आहेत, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.
परबांच्या अनधिकृत रिसॉर्ट बद्दल बोललो...
गेल्या ३ ते ४ महिन्या पासून माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या येत आहेत. माझ्या विरोधात कटकारस्थान केले जात आहे. जी व्हिडिओ क्लिप आली होती त्या मध्ये मी किरीट सोमय्या यांच्याशी कधीही बोललो नाही. दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी आतापर्यंत गप्प होतो. परब यांच्या रिसॉर्ट विषयी बोललो तर मी काय चुक केली. परब गद्दार असून तो शिवसेनेशी गद्दारी करत आहे. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. ५२ वर्षांपासून मी शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहे. ३२ वर्ष मी आमदार होतो. पक्षाने मला पुष्कळ काही दिले मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या मुलाला तिकीट देऊ नका असे सांगितले गेले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या संजय कदम या माजी आमदाराला परब मातोश्रीवर घेऊन आले. त्याला तिकीट द्या असे सांगितले. परंतु मी तुमचा विश्वासू असल्याने तुम्ही त्यांचे ऐकले नाही. पण आता हाच अनिल परब राष्ट्रवादीच्या पुढार्यांना हाताशी धरून कोकणातून मला संपविण्यासाठी राजकारण करीत आहे काय? ते आपण तपासून पहावे, असेही रामदास कदम म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष घालावे, असं भावनिक आव्हानही त्यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.
मी भगवा, शिवसेना कदापि सोडणार नाही
मी आई तुळजाभवानी ची शपथ घेऊन सांगतो की मरेपर्यंत भगव्याशी एकनिष्ठ राहीन मी कदापि पक्ष सोडणार नाही. परंतु परब सध्या पक्षाचे प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने वागत आहे तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर मी गप्प कसा राहू शकतो? गेल्या २ वर्षापासून मी मातोश्रीवर गेलो नाही. उद्धवजींची तब्येत बरी नसल्याने सध्या मी त्यांना भेटण्याचाही प्रयत्न केलेला नाही. मला, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांना मंत्रिपद देऊ नका, हे मी मागच्या निवडणुकीच्या पूर्वीच उद्धवजी ठाकरे यांना सांगितले होते. तरीसुद्धा मला व दिवाकर रावते यांना डावलून सुभाष देसाई यांना मंत्रीपद दिले. त्यावेळी सुध्दा मी नाराज झालो होतो. परंतु आता माझा मुलगा आमदार योगेश कदम यांनी पक्षात होत असलेल्या पक्षविरोधी अंतर्गत घडामोडी बद्दल वेळोवेळी ही बाब मंत्री सुभाष देसाई, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री उदय सामंत यांना सांगितली. परंतु या सर्वांनी आम्ही मंत्री अनिल परब यांना सांगतो, असे उत्तर दिले. यावरून आता परब पक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत का? असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला. हिम्मत असेल तर परब यांनी मुंबई वांद्रे येथून एखादी निवडणूक लढवून, ती जिंकून दाखवावी, असे आव्हानही कदम यांनी परब यांना केलं आहे.
उदय सामंत यांच्यावरही टीकास्त्र
कदम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. इतर पक्षातून आलेले आता आम्हाला शिवसेनेचा अर्थ समजावू लागले आहेत, असे ते म्हणाले. आम्ही पक्षात ५२ वर्ष एकनिष्ठेने काम करत आहोत व आत्ता बाहेरून आलेले हे आम्हाला शिवसेना आणि पक्षनिष्ठा काय असते हे समजावू लागले आहेत. यापेक्षा भयंकर परिस्थिती काय असू शकते. या पूर्ण प्रकरणाबाबत महिन्याभरात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांच्याशी बोलून लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.
Kadam Vs Parab : गद्दार कोण मी.. की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल
शिवसेना नेते रामदास कदम (ShivSena leader Ramdas Kadam) यांनी परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्यावर चौफेर टीका केली. गद्दार कोण (Who is a traitor) मी.. की अनिल परब? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेतील काही नेते जाणून-बुजून त्यांच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत हे स्पष्ट करतानाच त्यांनी या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष घालावे, असे भावनिक आव्हानही उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांना केले आहे.