मुंबई: या घटनेनंतर इंटरपोलने प्रसाद पुजारीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढली होती. यानंतर गुंड प्रसादला हॉंगकॉंगमध्ये त्याला गेल्या महिन्यात पकडण्यात आले होते. बनावट पासपोर्ट असल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये अटकेत असलेल्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या भारतात आणण्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासंबंधी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय? आणि ती का जारी केली जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश: भ्रष्टाचारी, दहशतवादी आणि कुख्यात गुन्हेगारांसाठी सुरक्षितपणे मोकाट फिरण्याचे तसेच वास्तव्यासाठी असलेल्या आश्रयस्थानांचा मुळासकट नायनाट करण्यासाठी सहकार्य व्हावे म्हणून ‘इंटरपोल’ने फरार कुख्यात गुन्हेगारांविरुद्धची रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) प्रक्रिया जलद गतीने मार्गी लावावी असे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्याचप्रमाणे कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याला चीन मधून भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. मुंबई पोलिसांच्या इंटरपोल विभागाने प्रसाद पुजारीविरोधात रेड कॉर्नर बजावली होती. या पार्श्वभूमीवर आपण आज इंटरपोल म्हणजे नेमके काय आहे? आणि त्याची कार्यपद्धती कशी असते ? हे जाणून घेऊया
इंटरपोल म्हणजे काय?: इंटरपोल (INTERPOL -इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन) ही 192 सदस्य देशांसह जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. जगभरातील पोलिसांना सक्षम बनवणे हा त्याच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. तसेच संपूर्ण जगात राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण बनवू शकेल हा या यंत्रणेमागचा मुख्य हेतू आहे. इंटरपोलची स्थापना करण्याची कल्पना सर्वप्रथम 1914 मध्ये मोनॅको येथे आयोजित 'फर्स्ट इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस काँग्रेस'मध्ये मांडण्यात आली होती. अधिकृतपणे 1923 मध्ये 'आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस आयोग' म्हणून स्थापना करण्यात आली. ही संस्था 1956 मध्ये इंटरपोल म्हणून ओळखली जाऊ लागली. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समधील लिऑन येथे बांधण्यात आले आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष 'मेंग होंगवेई' हे आहेत.
इंटरपोलची कार्यपद्धती कशी आहे?: इंटरपोल त्याच्या 192 सदस्य देशांतील पोलिसांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी लढण्यासाठी एकत्र काम करण्यास सक्षम करते. दहशतवादविरोधी, सायबर गुन्हे आणि संघटित गुन्हेगारी या तिन्ही प्रकारच्या गुन्ह्यांच्या विरोधात लढण्यासाठी इंटरपोल मुख्यतः पोलिसांचे कौशल्य आणि क्षमता वापरते. इंटरपोल आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत जवळून काम करते. भारतात सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन) अशा प्रकरणांमध्ये इंटरपोलच्या संपर्कात राहते. माहितीप्रमाणे सीबीआय ही संस्था इंटरपोल आणि अन्य तपास यंत्रणांच्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करते. भारतातून एखादा गुन्हेगार जेव्हा परदेशात पलायन करतो किंवा तो परदेशात फरार झाल्याची शक्यता वाटते. त्यावेळी त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस किंवा रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाते.
हेही वाचा: Shiv Sena Party Funds : 'आम्हाला शिवसेनेची मालमत्ता नको, मालमत्ता विषयक याचिकेशी आमचा संबंध नाही'