मुंबई - पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज संध्याकाळी 6.35 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे पश्चिम रेल्वेच्या चारही मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली आहे. ऐन संध्याकाळी झालेल्या या बिघाडामुळे परतीच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
तांत्रिक बिघडाची घोषणा स्थानकांवर करण्यात आली होती. यामुळे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. अखेर बिघाड दुरुस्त करण्यात आला असून पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे.