ETV Bharat / state

..असे बेजबाबदार गृहमंत्री आम्ही आयुष्यात पाहिलेले नाहीत - अतुल भातखळकर - Atul Bhatkhalkar criticizes Home Minister

अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातील विलगीकरण सेंटरमध्ये महिलांवर होणारे अत्याचार व महाराष्ट्रातील इतर प्रश्नांकडे लक्ष द्यावे. जी चौकशी त्यांना भाजपची कारायची आहे ती त्यांनी करावी. पण, भाजप सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत चौकशी अद्याप का केलेली नाही, तीही करावी. अशी मागणी भातखळकर यांनी केली.

अतुल भातखळकर
अतुल भातखळकर
author img

By

Published : Oct 6, 2020, 3:35 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण हे भाजपने हाईप करून त्याला वेगळे वळण दिल्याचा दावा अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाने केला आहे, असे सांगत महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आणि इतरांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. यावर राजकारणात असे बेजबाबदार गृहमंत्री आम्ही आयुष्यात पाहिलेले नाही, अशी सणसणीत टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली.

माहिती देताना भाजप नेते अतुल भातखळकर

गृहमंत्र्यांनी भाजपवर केलेले आरोप खोटे आहेत. त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे कधीच बेकायदेशीर काम करत नाही व केलेले नाही. अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातील विलगीकरण सेंटरमध्ये महिलांवर होणारे अत्याचार व महाराष्ट्रातील इतर प्रश्नांकडे लक्ष द्यावे. जी चौकशी त्यांना भाजपची कारायची आहे ती त्यांनी करावी. पण, भाजप सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत चौकशी अद्याप का केलेली नाही, तीही करावी. अशी मागणी भातखळकर यांनी केली.

हेही वाचा- 'बेस्ट' प्रवासादरम्यान मार्ग बदलले जात असल्याने प्रवाशांचे हाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.