ETV Bharat / state

नौटंकी करायची सवय आपल्याला नाही, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला - अजित पवार

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरूच आहे. (Supriya Sule) शरद पवार गटाकडून वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. (Nationalist Congress) आपल्याला जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असून नौटंकी करायची सवय नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 10:55 PM IST

अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

मुंबई Ajit Pawar: अजित पवार गटाच्या मुंबई विभागाचा कार्यकर्ता संवाद मेळावा रविवारी मुंबईत पार पडला. त्यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच नाव न घेता टोला लगावला आहे. आपल्याला काम करायची सवय आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवायची मला सवय नाही. काही लोकं रस्त्यावरील खड्ड्याजवळ जातात सेल्फी काढतात आणि म्हणतात हे पहा खड्डे, अशा प्रकारची नौटंकी करायची सवय आपल्याला नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Worker Dialogue Meeting)

कामात सातत्य ठेवण्याची गरज: मुंबईमध्ये आपला पक्ष वाढला पाहिजे, असा विश्वास वाढला आहे. मात्र २४ वर्षे झाली मुंबईत पक्षाची वाढ झाली नाही. सहा लोकसभा मतदारंसघांमध्ये २२७ वॉर्ड आणि ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष ज्या पद्धतीनं पोहचायला पाहिजे, तसा पोहचला नाही. त्यासाठी आम्ही कमी पडलो अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. विविध जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका आपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजा, फुले, शाहू, आंबेडकर या युगपुरुषांचा वारसा आपल्यासोबत आहे. नाना रंगांचे, नाना ढंगाचे लोक मुंबईत आहेत. मीनी इंडिया म्हणून मुंबईला ओळखले जाते. आपल्याकडे वेळ कमी आहे. कामात सातत्य ठेवण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.

आपल्यात धमक आहे: १२ जानेवारीला पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई महापालिका, रस्ते विकास महामंडळ, राज्य सरकार आणि वेळ पडली तर केंद्र सरकारकडून आपण पैसा आणू शकतो. धारावीबद्दलचे काम हाती घेतले आहे. ते काम खरं म्हणजे आम्ही सत्तेत असताना सुरू केले. आता काही लोक संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्या एका टेंडरमुळे कुठल्या एका उद्योगपतीचा मोठा फायदा होणार आहे, असं दाखवलं जात आहे, ते आपण तपासून पाहू. सरकारमध्ये आम्ही काम करत असलो तरी जनतेवर कुठे अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करणार. अनेकदा टेंडर निघतात आणि ती रद्द होतात. मोठे टेंडर असेल तर विरोधकांचे काम सोपे आहे. त्यात भ्रष्टाचार होत आहे, असे म्हणून मोकळे होतात. प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे. उगीज करु, बघू, उद्या ये असं आपलं नाही.

विचारधारेशी एकनिष्ठ: आपण तीन पक्ष एकत्र आलो असलो तरी आपली विचारधारा आपण सोडलेली नाही. जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता सर्वाधिक आहे. एका कार्यकर्त्यानं पाचशे ते सातशे मते दिली पाहिजे. ग्रामीण भागातील पक्ष ही आपल्या पक्षाची ओळख असली तरी शहरी भागात आपण काम करायचे नाही, असं होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण कामाला लागा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

हेही वाचा:

  1. बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड अन् शुद्ध आल्यावर वेगळीच बडबड; धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका
  2. 'हे' बोलणं बरं नव्हं; राज ठाकरेंनी टोचले मराठी कलाकारांचे कान
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट पाकिस्तान सीमेवर, काय आहे विषय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.