ETV Bharat / state

समुद्राला भरती असताना मुसळधार पाऊस पडल्याने पाणी साचले ; पालिकेचा दावा - समुद्र भरतीमुळे मुंबई तुंबली

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. समुद्राला भरती असताना मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत जोरदार पाऊस
author img

By

Published : Jul 15, 2020, 8:34 AM IST

मुंबई - समुद्राला भरती असताना मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे. पाणी साचलेल्या ठिकाणावर पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. पुढील 24 तासात आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मध्यम व जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर 20.2 तर सांताक्रूझ केंद्रावर 77.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई महापालिकेच्या पर्जन्यमापन केंद्रांवर शहर विभागात 35.18, पूर्व उपनगरात 25.85 तर पश्चिम उपनगरात 49.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. समुद्राला भरती असून 3.39 मीटरच्या लाटा उसळण्याची अंदाज होता. मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचल्याचे पालिकेने म्हटले आहे.

या ठिकाणी साचले पाणी - हिंदमाता, शक्कर पंचायत रोड वडाळा, दादर टिटी, कचरापट्टी जंक्शन धारावी, वडाळा फायर स्टेशन, सायन रोड नंबर 24, बैगनवाडी, नेहरू नगर, निलम जंक्शन, बंटर भवन, आशिष जंक्शन चेंबूर, अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचले होते. पाणी साचल्याने या विभागातील वाहतूक वळवण्यात आली होती.

पालिकेचा दावा फोल - हिंदमाता येथे पाणी साचलेल्या ठिकाणी पोलीस नागरिकांना आणि पाण्यात आडकेल्या वाहनांना मार्ग काढून देत होते. हिंदमाता येथे पाणी तुंबू नये, म्हणून पालिकेने पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता दुप्पट केली आहे. यामुळे पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा लवकर होईल, असा पालिकेने केलेला दावा फोल ठरला आहे.

पडझड - मुंबईत 2 ठिकाणी घर व घरांचा काही पडण्याच्या, 8 ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या तर 4 ठिकाणी शॉकसर्किटच्या घटनांची पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंद झाली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.