ETV Bharat / state

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश, मातोश्रीवर बांधले शिवबंधन - minister gadakh join shivsena

मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली. त्या विश्वासाला पात्र राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार आहे व शिवसेना वाढीसाठी झटणार आहे. असे शंकरराव गडाख यांनी सांगितले.

mumbai
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Aug 11, 2020, 4:32 PM IST

मुंबई- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शंकरराव गडाख हे नेवासा विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून निवडून आले होते. माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेन, असे यानिमित्ताने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची शंकरराव गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने विधानसभेत गडाख अपक्ष निवडून येताच नार्वेकर यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता. सेना सत्तेत असो वा नसो, मी तुमच्याबरोबर राहीन, असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसऱ्या पिढीतील दोन्ही कुटुंबातील सदस्य आता शिवबंधनात बांधले गेले आहेत. नगर जिल्ह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मातब्बर नेते आहेत. नगर शहरातील सेनेचे माजी मंत्री व उप नेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यामुळे, जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली. अशात नामदार गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकांसाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यावरील कोरोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे. माझ्या वडील व हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्नेहाचे संबंध होते. गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला, म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली. त्या विश्वासाला पात्र राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार आहे व शिवसेना वाढिसाठी झटणार आहे. शिवसेना हा पक्ष शेतकरी, कष्टकरी तसेच सर्व सामान्य जनता यांच्या बरोबर असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे, असे शंकरराव गडाख यांनी सांगितले.

हेही वाचा- कोरोनाच्या संकटातही वरळी बीडीडीवासीयांना 'सॅम्पल फ्लॅट' पाहण्याची घाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.