मुंबई - लॉकडाऊननंतर अनेक व्यावसायिक, डबेवाले, परिचारिका यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी आजही काही शिष्टमंडळे आले होती. यात मुंबईतील सर्व गावठाण कोळीवाडे शिष्टमंडळ प्रतिनिधी, महाराष्ट्रातील ब्रास बॅंडवाले, गेल्या ४-५ महिन्यांनतर राज ठाकरेंच्या प्रयत्नाने पगार झाला म्हणून एअरपोर्ट कर्मचारी आभार मानायला आले होते. तसेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायिक संघाच्या महाराजांचे शिष्टमंडळही विविध मागण्यासांठी आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडले त्यावेळी राज ठाकरे यांनी सरकार दरबारी त्यांचे प्रश्न मांडू आणि सोडवून घेऊ, असे आश्वासन सर्व शिष्टमंडळाना दिले.
कोळी बांधव शिष्टमंडळाच्या मागण्या
तसेच ठाणे मुंबई आणि नवी मुंबई येथील ब्रास बँड यांनादेखील वाजवण्यासाठी परवानगी द्यावी तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोळी बांधवांचा गावठाण प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावा, यामध्ये आपण मध्यस्थी करावी अशी मागणी कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाकडून राज ठाकरे यांना करण्यात आली. यावर राज ठाकरे यांनी सर्व शिष्टमंडळाचे प्रश्न ऐकून त्या-त्या विभागाशी संपर्क साधून आपण न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी सर्व शिष्टमंडळाना दिले.
हेही वाचा - 'डिजिटल मीडिया'तील कंटेंटवर आता केंद्र सरकारचे नियंत्रण