ETV Bharat / state

मुंबईत भिंत कोसळल्याच्या ७ घटना, या वाचून तुमच्याही अंगावर येईल शहारा - heavy rain

एक नजर मुंबईत गेल्या सात वर्षांत घडलेल्या आणि मन हेलाऊन टाकणाऱ्या भिंत कोसळल्याच्या ७ घटनांवर...

पावसाचे बळी : महाराष्ट्रात 7 वर्षांत तब्बल ९ ठिकणी कोसळल्या भिंती, शेकडो जणांना गमवावे लागले प्राण
author img

By

Published : Jul 2, 2019, 1:47 PM IST

Updated : Jul 2, 2019, 6:07 PM IST

मुंबई - तब्बल चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने मंबईचे जनजीवन तर विस्कळीत केलेच. शिवाय अनेकांचे संसारही उद्धस्त केले आहेत. मुंबईसाठी सोमवारची रात्र ही काळरात्रच ठरली. याच रात्री पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून तब्बल 19 जणांना जीव गमवावा लागला. तर कल्याणमध्ये नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.

पुण्यातल्या कोंढवा भागात गेल्या शनिवारीच भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेच्या जखमा ओल्या असताना येथे सोमवारी मध्यरात्री, अशीच आणखी एक घटना घडली. येथील आंबेगांवातील सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय नाशकातही निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनांत मोठ्या संख्येने रहिवासी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नजर टाकूयात महाराष्ट्र गेल्या सात वर्षांत घडलेल्या आणि मन हेलाऊन टाकणाऱ्या अशाच काही घटनांवरून...

  • पुण्यातील दांडेकर पुलाजवळ जून २०१३ मध्ये भिंत कोसळली होती. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
  • महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पावसामुळे २१ जून २०१३ रोजी एक तीन मजली इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच चिमुकल्यांसह तब्बल १० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर तब्बल २० जणांना या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात प्रशासनाला यश आले होते.
  • मुंबईत ६ ऑगस्ट २०१६ रोजी एक घर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला होता.
    ठाण्यात जून २०१८ च्या पहिल्याच आठवड्यात एका सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली होती. या भिंतिखाली दबून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. तर २ जण गंभीर जखमी झाले होते.
  • उल्हासनगरमध्ये १५ जुलै २०१८ रोजी मुरलीवाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत एका ४० वर्षीय महिलेचा स्लॅबखाली दबून मृत्यू झाला होता. ही इमारत १९९५ मध्ये बांधण्यात आलेली होती.
  • मुंबईतील गोरेगावमध्ये २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळच्या सुमारास एक दोन मजली निर्माणाधीन इमारत कोसळली होती. या अपघातात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर ८ जण जखमी झाले होते.
  • मुंबईतील दत्तावाडीमधील जनता वसाहतीत २४ जून २०१९ रोजी एका मैदानाची संरक्षण भिंत कोसळली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.
  • नुकताच शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात एका इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ मजुरांचा नाहक बळी गेला. हे सर्वजण बिहारमधून कामासाठी आले होते. यात चार मुले आणि दोन महिलांचाही समावेश होता.

Intro:Body:

Wall collapse incidants in Maharashtra

MAHARASHTRA, WALL, COLLAPSE, INCIDENTS, CHRONOLOGY, महाराष्ट्र, भिंती, मुंबई, Mumbai, pune, Nashik, पुणे, नाशिक 

पावसाचे बळी : महाराष्ट्रात 7 वर्षांत तब्बल ९ ठिकणी कोसळल्या भिंती, शेकडो जणांना गमवावे लागले प्राण 

मुंबई - तब्बल चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने मंबईचे जनजीवन तर विस्कळीत केलेच. शिवाय अनेकांचे संसारही उद्धस्त केले आहेत. मुंबईसाठी सोमवारची रात्र ही काळरात्रच ठरली. याच रात्री पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून तब्बल 19 जणांना जीव गमवावा लागला. तर कल्यानमध्ये नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.

शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेच्या जखमा ओल्या असताना येथे सोमवारी मध्यरात्री, अशीच आणखी एक घटना घडली. येथील आंबेगांवातील सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय नाशकातही निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले आहेत.

या दुर्घटनांत मोठ्या संख्येने रहिवासी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नजर टाकूयात महाराष्ट्र गेल्या सात वर्षांत घडलेल्या आणि मन हेलाऊन टाकणाऱ्या अशाच  ९  घटनांवरून...

पुण्यातील दांडेकर पुलाजवळ जून २०१३ मध्ये भिंत कोसळली होती. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 6:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.