ETV Bharat / state

राज ठाकरेंच्या मताने फरसा फरक पडणार नाही; विनोद तावडेंचे पानसेंना प्रत्युत्तर - शिक्षण मंत्री विनोद तावडे

वर्षोनुवर्षे आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी कामे केलेली नाहीत, अशा पक्षांना मते द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे ४० टक्के ड्रीम प्रोजेक्टची कामे पूर्ण केली. त्या मोदी सरकारला मात्र मत देऊ नका, असे म्हणणे म्हणजे राजकीय दिवाळखोरी असल्याचे तावडे म्हणाले.

शिक्षण मंत्री विनोद तावडे
author img

By

Published : Apr 20, 2019, 5:42 PM IST

मुंबई - मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप केले जात आहेत. मात्र, राज ठाकरे यांचे मत पडले, तर काय मोठा फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारे लोक केवळ टाईमपास, मनोरंजन आणि करमणुकीसाठी जातात, असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. मात्र, त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो, असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे.

शिक्षण मंत्री विनोद तावडे

राज ठाकरे यांच्या मताचा अधिकार सरकार काढतेय, असा जावईशोध मनसे नेते अभिजीत पानसे यांनी लावला होता. त्यांनाच प्रत्युत्तर देताना तावडे आज माध्यमांशी बोलत होते. पानसे यांना बहुधा ठाकरे या चित्रपटाची स्क्रिप्ट आठवली असेल. मात्र, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला. त्यांनाच राज ठाकरे मते देण्याचे आवाहन करीत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी यावेळी केली.

नोटाबंदी राज ठाकरे यांना का झोंबली आहे? जे सगळे पैसे बँकेत आले ते कोणाकोणाच्या नावाने आले, त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे. विनाखाते फिरणारे पैसे खात्यात जमा झाले. याचाच अर्थ काळा पैसा जमा झाला असल्याचे तावडे म्हणाले. यासाठी अर्थकारण समजून घ्यावे, ते समजले नाही, की अशी गडबड होते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

वर्षोनुवर्षे आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी कामे केलेली नाहीत, अशा पक्षांना मते द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे ४० टक्के ड्रीम प्रोजेक्टची कामे पूर्ण केली. त्या मोदी सरकारला मात्र मत देऊ नका, असे म्हणणे म्हणजे राजकीय दिवाळखोरी असल्याचे तावडे म्हणाले.

'मोहिते पाटील तुम्ही आता संघाची अर्धी चड्डी आणि शर्ट घालू नका' या शरद पवारांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी यावेळी प्रत्त्युत्तर दिले. यावर ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गणवेशात नाही, तर विचारात आहे. मोहीते पाटील यांनी त्या विचाराचा स्वीकार केला असेल, तर शरद पवार यांना वाईट वाटण्याचे कारण नाही.

शरद पवार यांनी 'पुलोद'चे मुख्यमंत्री होतानासुध्दा ते विचार स्वीकारले होते. त्यावेळी संघाविषयी मांडलेली मते आठवून बघावीत. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी तुम्ही सोयीचे राजकारण करता. मात्र, मोहिते-पाटील यांनी तसे केले नाही. संघ हा गणवेशात नाही, तर विचारात आहे. त्यांनी संघाच्या विचारांचा स्वीकार केला आहे. या विचारासोबत जाऊन जर राज्यासह देशाचा विकास होणार असेल, तर तसे करणे आवश्यक आहे, असेही तावडेंनी यावेळी स्पष्ट केले.

Intro: मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप पसरवून हौतात्म्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे-विनोद तावडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन व करमणुकीसाठी जातात असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मारला.

राज ठाकरे यांच्या मताचा अधिकार सरकार काढतेय असा जावईशोध मनसे नेते अभिजीत पानसे यांनी लावल्याबद्दल प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, पानसे यांना बहुधा त्यांच्या ठाकरे या त्यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आठवली असेल, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला त्यांनाच मते द्या असे आज राज ठाकरे सांगत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी केली.

मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप पसरवून हौतात्म्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण राज ठाकरे यांचे मत पडले तर काय मोठा फरक पडणार नाही. कारण त्यांच्या सभांना गेलेला माणूस टाईमपाससाठी गेलो असे बोलत असल्याचे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, नोटाबंदी राज ठाकरे यांना का झोंबली आहे, जे सगळे पैसे बँकेत आले ते कोणाकोणाच्या नावाने आले, त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे, म्हणजेचे जे पैसे बाहेर अनअकाऊंटेड फिरत होते ते अकाऊंटेड झाले याचा अर्थ काळा पैसा आला नाही का.. यासाठी अर्थकारण समजून घ्यावं लागतं आणि ते समजलं नाही की अशी काहीतरी गडबड होते, असा टोलाही त्यांनी मारला.

ज्या पक्षाने वर्षोनुवर्षे आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी काहीही विकासाची कामे केलेली नाहीत त्यांना मते द्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे ४० टक्के ड्रीम प्रोजेक्टची कामे पुर्ण केली व अजूनही काही प्रोजेक्टची कामे सुरु आहेत त्या मोदी सरकारला मात्र मत देऊ नका, असे म्हणणे म्हणजे राजकीय दिवाळखोरी आहे असेही तावडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गणवेशात नाही तर विचारात आहे आणि मोहीते–पाटील यांनी त्या विचाराचा स्वीकार केला असेल तर शरद पवार यांना वाईट वाटण्याचे कारण नाही, असा टोला विनोद तावडे यांनी मारला.

‘मोहिते पाटील तुम्ही आता संघाची अर्धी चड्डी आणि शर्ट घालू नका’ या टीकेला प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, शरद पवार यांनी जेव्हा पुलोदचे मुख्यमंत्री होताना सुध्दा ते विचार स्वीकारले होते, तेव्हा संघाविषयी मांडलेली मते आठवून बघावीत. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी तुम्ही सोयीचे राजकारण करता पण मोहिते-पाटील यांनी तसे केले नाही. संघ हा गणवेशात नाही तर विचारात आहे. त्यांनी संघाच्या विचारांचा स्वीकार केला आहे. या विचारासोबत जाऊन जर राज्याचा आणि देशाचा विकास होणार असेल तर तसे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.