ETV Bharat / state

वांद्रे जमाव प्रकरण : कामगारांना एकत्र जमवणाऱ्या परप्रांतीय विनय दुबेला अटक - मुंबई वांद्रे जमाव प्रकरण

विनय दुबे हा मजुरी करणाऱ्या कामगारांच्या उत्तर भारतीय महासंघाचा अध्यक्ष आहे. त्याने फेसबुकवर 18 एप्रिलला गावी जाण्यासाठी बस डेपोजवळ जमण्याचे आवाहन कामगारांना केले होते. विनय दुबे याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले होते.

कामगारांना एकत्र जमवणाऱ्या आरोपी विनय दुबेला अटक

author img

By

Published : Apr 15, 2020, 9:09 AM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मंगळवारी मुंबईतील वांद्रे बस डेपो येथे जमलेला जवळपास दीड हजार नागरिकांचा जमाव पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवला होता. या जमावाने देशभराचे लक्ष वेधले होते. कोरोना महामारीच्या संकटात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यामुळे जवळपास हजार जणांविरोधात कलम 188 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपी विनय दुबेला अटक करण्यात आली आहे .

विनय दुबे हा मजुरी करणाऱ्या कामगारांच्या उत्तर भारतीय महासंघाचा अध्यक्ष आहे. त्याने फेसबुकवर 18 एप्रिलला गावी जाण्यासाठी बस डेपोजवळ जमण्याचे आवाहन कामगारांना केले होते. विनय दुबे याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले होते.

राज्य तसेच केंद्र सरकारचा निषेध करत लॉकडाऊन मोडत परप्रांतीय मजुरांनी बांद्रा बस डेपोजवळ आंदोलन करण्यासाठी एकत्र येण्यास त्याने सांगितले. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली परिसरातून विनय दुबे याला अटक केली असून त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.