ETV Bharat / state

विक्रम काळे म्हणाले, तावडेंचे शालेय शिक्षणमंत्रीपद गेल्याने अतिव दुःख झाले; सभागृहात हशा पिकला - विक्रम काळे

तावडे हे अत्यंत लोकप्रिय निर्णय घेणारे शालेय शिक्षणमंत्री होते. अशा या गुणी मंत्र्याचे शालेय शिक्षणमंत्री पद काढून घेतल्याने आमच्यासुद्धा भावना दाटून आले आहेत, अशी खोचक भावना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. त्यानंतर सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार हशा पिकला.

सभागृहात हशा पिकला
author img

By

Published : Jun 18, 2019, 8:25 AM IST

मुंबई - शालेय शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांनी शिक्षक आणि शाळांचे अत्यंत लोकप्रिय निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयाचा राज्यभरात मोठा गवगवा झाला. ते अत्यंत गुणी मंत्री होते. त्यामुळे अशा गुणी माणसाचे मंत्रिपद काढून घेतल्याने आमच्यासारख्या शिक्षक आमदारांना अतिव दुःख झाले, अशी खोचक भावना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. त्यानंतर सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार हशा पिकला.

राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत विनोद तावडे यांचे शालेय शिक्षणमंत्री पद काढून घेतल्याच्या संदर्भात एक निवेदन केले. त्या निवेदनात त्यांनी म्हटले, की तावडे हे अत्यंत लोकप्रिय निर्णय घेणारे शालेय शिक्षणमंत्री होते. अशा या गुणी मंत्र्याचे शालेय शिक्षणमंत्री पद काढून घेतल्याने आमच्यासुद्धा भावना दाटून आले आहेत, असे म्हणत काळे यांनी खोचक विधान केले. त्यांच्या या म्हणण्याचा रोख सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनाही लक्षात आल्याने दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये हशा पिकला. काही वेळासाठी तावडे हे सभागृहाच्या बाहेर गेले होते. मात्र, सभागृहात आपल्यावर निवेदन सुरू असल्याचे कळताच ते धावत आले. मात्र, तोपर्यंत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या विषयावर काळे यांचे निवेदन सुरू असतानाच पुढील कामकाज पुकारले. मात्र, सभागृहात तावडे यांच्या चेहऱ्यावर मागील साडेचार वर्षांत पहिल्यांदा पराभव झाल्यासारखे भाव उमटले होते.

मागील साडेचार वर्षात शालेय शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांनी शिक्षक आमदारांना कोणत्याही प्रश्नावर समाधानकारक असे उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच शिक्षक आमदारांचा मोठा राग होता. अनुदानित शाळा, शिक्षक यांचे प्रश्न अर्धवट ठेवल्याने तावडे हे शिक्षक आमदार आणि विविध शिक्षक संघटनांच्या टीकेचे धनी बनले होते. त्यातच अखेरच्या टप्प्यात का असेना भाजपकडून तावडे यांचे शालेय शिक्षणमंत्री पद काढून घेतल्याने शिक्षण आमदारांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तर विक्रम काळे यांनी सभागृहातच तावडे यांच्यासाठी खास निवेदन वाचून दाखवत इतर शिक्षक आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

Intro:शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, तावडेंचे शालेय शिक्षणमंत्रीपद गेल्याने अतीव दुःख झाले..!! सभागृहात हशा पिकलाBody:शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, तावडेंचे शालेय शिक्षणमंत्रीपद गेल्याने अतीव दुःख झाले..!! सभागृहात हशा पिकला

(या बातमीसाठी विधानभवनचे फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. 17 :

शालेय शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडे यांनी शिक्षक आणि शाळांचे अत्यंत लोकप्रिय निर्णय घेतले, त्यांच्या निर्णयाचा राज्यभरात मोठा गवगवा झाला. ते अत्यंत गुणी मंत्री होते त्यामुळे अशामुळे गुणी माणसाचे मंत्रिपद काढून घेतल्याने आमच्यासारख्या शिक्षक आमदारांना अतीव दुःख झाल्याची खोचक अशी भावना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत व्यक्त करताच सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार हशा पिकला.
राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे शालेय शिक्षण मंत्री पद काढून घेतल्याच्या संदर्भात एक निवेदन केले त्या निवेदनात त्यांनी तावडे यांच्यावर खोचकपणे परंतु त्यांचा गौरव करीत असल्याचे सांगत ते अत्यंत लोकप्रिय निर्णय घेणारे शालेय शिक्षण मंत्री होते. त्यामुळे आम्हाला अतीव दुःख झाले असल्याचे सांगत अशा या गुणी मंत्र्याचे शालेय शिक्षण मंत्री पद काढून घेतल्याने आमच्या सुद्धा भावना दाटून आल्या असल्याचे काळे म्हणाले. काळे यांच्या या म्हणण्याचा रोख सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनाही लक्षात आल्याने दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये हशा पिकला. काही वेळासाठी तावडे हे सभागृहाच्या बाहेर गेले होते, मात्र सभागृहात आपल्यावर निवेदन सुरू असल्याचे कळताच ते धावत आले, मात्र तोपर्यंत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या विषयावर काळे यांचे निवेदन सुरू असतानाच पुढील कामकाज पुकारले...मात्र सभागृहात तावडे यांच्या चेहऱ्यावर मागील साडे चार वर्षांत पहिल्यांदा पराभव झाल्यासारखी भाव उमटले होते.

मागील साडेचार वर्षात शालेय शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडे यांनी शिक्षक आमदारांना कोणत्याही प्रश्नावर समाधानकारक असे उत्तर न दिल्याने त्यांच्यावर सर्वच शिक्षक आमदारांचा मोठा राग होता. त्यातच अखेरच्या टप्प्यात का असेना भाजपाकडून तावडे यांचे शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री पद काढून घेतल्याने शिक्षण आमदारांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच वातावरणाचा एक भाग म्हणून विक्रम काळे यांनी तावडे यांची फिरकी घेण्यासाठी सभागृहात एक निवेदन सादर करून तावडे यांचे शालेय शिक्षण मंत्री पद गेल्याने आम्हाला अतीव दुःख झाले असून आमच्या भावना ही दाटून आल्याच सांगितले.
अनुदानित शाळा, शिक्षक यांचे प्रश्न अर्धवट ठेवल्याने तावडे हे शिक्षक आमदार आणि विविध शिक्षक संघटनांच्या टीकेचे धनी बनले होते.मंत्रिमंडळ फेररचनेत त्यांचे शालेय शिक्षण मंत्रीपद काढून घेतल्याने त्याविषयी आज शिक्षक आमदार यांच्या वतीने आमदार विक्रम काळे यांनी सभागृहातच तावडे यांच्यासाठी खास निवेदन वाचून दाखवत इतर शिक्षक आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली.Conclusion:शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, तावडेंचे शालेय शिक्षणमंत्रीपद गेल्याने अतीव दुःख झाले..!! सभागृहात हशा पिकला
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.