मुंबई - राज्यात दुष्काळाने कहर केला आहे. राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यांमध्ये पाण्याचे भीषण संकट निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही शहरांमध्ये ४ ते ५ तर काही ठिकाणी १५ ते २० दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिक टाहो फोडताना दिसत आहेत.
पाहूया कोणत्या शहरात किती दिवसानंतर होतो पाणीपुरवठा
१) बीड - १५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा
२) उस्मानाबाद - १५ ते २० दिवसानंतर पाणीपुरवठा
३) वाशिम - १२ दिवसाआड पाणीपुरवठा
४) लातूर - शहराला १० दिवसातून पाणीपुरवठा
५) जालना - ८ दिवसाआड पाणीपुरवठा
६) यवतमाळ - शहरात ८ दिवसानंतर पाणीपुरवठा होते
७) धुळे - ७ दिवसाआड पाणीपुरवठा
८) नांदेड - ४ दिवसाआड पाणीपुरवठा
९) वर्धा - ४ दिवसाआड पाणीपुरवठा
१०) सोलापूर - ४ दिवसाआड पाणीपुरवठा
११) औरंगाबाद - शहरामध्ये ४ ते ५ दिवसानंतर पाणी पुरवठा
१२) अमरावती - शहरात २ दिवसाआड पाणीपुरवठा
१३) जळगाव - ३ दिवसाआड पाणीपुरवठा
१४) रत्नागिरी - जिल्ह्यात सुरळीत पाणीपुरवठा, दापोलीत मात्र, ८ दिवसांनी पाणी
१५) गोंदिया - दिवसातून एकदाच पाणीपुरवठा
१६) सातारा - दिवसातून सकाळी एकवेळ पाणीपुरवठा
१७) रायगड - टँकरने पाणीपुरवठा सुरू
१८) नागपूर - टँकरने पाणी पुरवठा सुरू
१९) नाशिक - शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू, मात्र, वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा
२०) हिंगोली - जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणीटंचाईचे संकट
२१) नंदुरबार - शहरात १ दिवसाआड पाणीपुरवठा
२२) सांगली - शहरात सुरळीत तर ग्रामीण भागात २०० टँकरने पाणीपुरवठा
२३) अहमदनगर - कोपरगावला १२ दिवसाआड पाणीपुरवठा
२४) परभणीला - १५ दिवसाआड पाणीपुरवठा
दुष्काळ हा महाराष्ट्राच्या पाचवीलाच पूजला आहे. सातत्याने येणार्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात त्यावर काम होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी पाणी फाऊंडेशनच्या कामांसाठी हजारो हात उत्स्फूर्तपणे पुढे येत असताना जलयुक्तसाठी लोकसहभाग नसल्याचे चित्र दिसत आहे.