मुंबई - दहिसर पोलिसांनी ४ चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 47 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यातील दोन चोर आपल्या प्रेयसींना फिरवण्यासाठी वाहन चोरी करत असल्याचे समजले आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये 10 रिक्षांचा समावेश आहे. जप्त केलेल्या 47 वाहनांची एकूण किंमत 18 लाख 5 हजार रुपये आहे. असलम मखदूम शेख (वय 19), उमेश दामू राठोड (वय 22), इशाद हारून चौधरी (वय 20), सोहेल रहमतुल्ला शाह (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील असलम शेख आणि इशाद चौधरी हे आपला प्रेयसींना फिरवण्यासाठी वाहनांची चोरी करायचे. आरोपींना मीरारोड, मालवणी, दहिसर, अंबाबाडी या भागातून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - म्हाडा लॉटरीलाच 'घरघर'..! घरांचा शोध होत नसल्याने सोडतीला विलंब