मुंबई : नवा वाद समोर येताच आयआयटी प्रशासनाने मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. या संदर्भात पुन्हा विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी विषम वागणुकीच्या आयआयटीच्या प्रशासनाच्या विरोधात टीका केली आहे. दर्शन सोळंकी या अभियांत्रिकी रसायनशास्त्र विषयात प्रथम वर्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत भेदभाव झाला. जातीय वागणूक झाली आणि त्याने आत्महत्या केली; असा त्याच्या नातेवाईकांचा आणि आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल विद्यार्थ्यांचा तसेच विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे. त्याबाबत सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
आता मांसाहार करणाऱ्यांच्या विरोधात शाकाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेदभावाची वागणूक दिल्याची घटना यापूर्वी घडत होती; आता ती बॅनर वर आली आहे. त्यामुळे आयआयटीने काही मार्गदर्शक नियम लागू केले .आणि ज्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांची जात, धर्म ,सामाजिक आर्थिक स्थिती विचारात घेऊन अपमानास्पद वागणूक देऊ नये. कोणासोबतही जातीवादी किंवा भेदभाव करू नये; असे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत.
मात्र आयआयटी मध्ये शाकाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'कँटीनमध्ये येथे मांसाहार करू नये 'असा फलक लावल्यामुळे वाद सुरू झाला आहे. यावर प्रशासनाने मार्गदर्शक नियम लागू केले. जाती भेदभावातून वागू नका कोणालाही रँक विचारू नका असे नियमांमध्ये म्हटले आहे. कॅन्टींग मध्ये पूर्वीपासूनच शाकाहार करणारे काही विद्यार्थी मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते जवळ आले की दंड लावत. कारण शाकाहारी टेबल जवळ मांसाहारी विद्यार्थी बसता कामा नये. अशी शाकाहारी भेदभाव पुर्ण वागणूक पूर्वी देखील मिळत होती.
गेल्या आठवड्यामध्ये शाकाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या टेबलाजवळ 'मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅन्टीन मध्ये बसू नये' असा फलक लावला. त्यामुळे वाद शिगेला पोहोचलाय. मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की 'पूर्वी तुम्ही दंड लावत होते. आणि आता तुम्ही ते बॅनरवर लिहले आहे. तरी भेदाभेद सुरू आहे म्हणूनच प्रशासनाला हे नियम जारी करावे लागले. याचा अर्थ इथे जातिवाद, भेदभाव होतो हे यातून स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलने 'ईटीव्ही भारत' ला दिली. याआधी कॅन्टींग मध्ये जेवताना मांसाहारी विद्यार्थ्यांकडून दंड घेतला जात होता. तेव्हा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही हे असमानतेने वागणं आम्ही खपवून घेणार नाही. असेही म्हणले आहे.
आयआयटी मधील काही विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार अंतर्गत 29 नोव्हेंबर 2022 रोजी माहिती विचारली होती "की आयआयटीच्या आवारात कोणत्या कॅन्टीन मध्ये शाकाहार मांसाहार करणाऱ्यांना बाजूला बसवतात किंवा नाही. त्यावेळेला आयआयटी प्रशासनाने त्यात उत्तर दिले होते की जैन फुड स्टुडन्ट शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र काही केले जात नाही आणि स्वातंत्र काही बसवले जात नाही. कोणताही दंड आकारला जात नाही. त्याबाबत कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत.मांसाहार करणाऱ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात नाही.
आयआयटीला नियम जारी करावे लागले संदर्भात जातीय अंत समितीचे जेष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की "आयटीमध्ये दर्शन सोळुंकेची जातीय भेदभावामुळेच आत्महत्या झाली. विद्यार्थी शाकाहार करणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ उच्च कुलाचे, वर्णाचे समजतात काय .आणि म्हणून मांसाहार करणाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात. हे राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या समानतेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. मुळे असे जर कोणी बॅनर लावत असेल आणि मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देणारा असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई तातडीने करायला पाहिजे. अन्यथा आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल.
मांसाहार करणाऱ्यांच्या विरोधात जातीय भेदभावातून वागणूक दिली जाते. म्हणूनच आयटी ला मार्गदर्शक नियम जारी करावे लागले हे यातून स्पष्ट होते. असे राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले ते म्हणाले की, की आयआयटीने उशिरा याबाबत मार्गदर्शक नियम जारी केले ते ठीक आहे .परंतु शाकाहारी विद्यार्थ्यांनी मांसाहारी विद्यार्थ्यांना बाजूला बसू देऊ नये म्हणजे ही भेदभावाची वागणूक आहे हे होत असेल तर याचा अर्थ जातीय भेदभाव अजूनही होतो. परंतु आयआयटी कडून अधिक कडक निर्बंध नियम तोडणाऱ्यांवर लावले गेले पाहिजेत.