ETV Bharat / state

Prakash Ambedkar on MLA Suspension Cancellation : १२ आमदारांचे निलंबन रद्द करणारा निर्णय असंवैधानिक - प्रकाश आंबेडकर - आमदार निलंबन निर्णय रद्द

महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले ( MLA Suspension Cancellation by Supreme Court ) आहे, हा निर्णय असंवैधानिक आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने बारा आमदारांच्या निलंबनाचा विधिमंडळाचा निर्णय रद्दबादल ठरवल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Jan 29, 2022, 2:49 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले ( MLA Suspension Cancellation by Supreme Court ) आहे, हा निर्णय असंवैधानिक आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने बारा आमदारांच्या निलंबनाचा विधिमंडळाचा निर्णय रद्दबादल ठरवल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले. ( Prakash Ambedkar Reaction on MLA Suspension Cancellation )

याबाबत बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर -

सभागृहातील कामकाजाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही न्यायालयाला नाही, असेही त्यांनी सांगितले. सभागृह, मग ते संसद असो की राज्याची विधानसभा असो, "नेशन विदिन नेशन" या तत्वावर चालते. सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा - Nana Patole on MLAs Suspension Cancellation : विधानसभा ही सार्वभौम; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

तसेच महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावे लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानिक असून अधिकार क्षेत्र नसताना दिलेला निर्णय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, मागच्या वर्षी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) यांच्याशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. ( Supreme Court Cancelled 12 Bjp Mla Suspension ) यानंतर भाजपमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.