ETV Bharat / state

साध्वी प्रज्ञावर भाजपने कारवाई करावी; मुंबईत विविध संघटनांचे उपोषण - nathuram godase

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते, असे वक्तव्य केल्यानंतर अनेक स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

साध्वी प्रज्ञावर भाजपने कारवाई करावी म्हणून मुंबईत विविध संघटनांचे उपोषण
author img

By

Published : May 18, 2019, 8:10 PM IST

मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते, असे वक्तव्य केल्यानंतर अनेक स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, तर महात्मा गांधी देशद्रोही होते का? असा प्रश्न मांडत मुंबईतील काही समाजसेवी संघटनांनी एकत्र येत आज (१८ मे) उपोषण केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी या समाजसेवी संघटनांनी केली आहे. साध्वींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फोडून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतल्या काही समाजसेवी संघटनांनी एकत्र येऊन साध्वींच्या वक्तव्याचा निषेध केला.

साध्वी प्रज्ञावर भाजपने कारवाई करावी म्हणून मुंबईत विविध संघटनांचे उपोषण

साध्वींनी केलेल्या वक्तव्यानंतर नरेंद्र मोदी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. त्यांना मनातून कधीच माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले होते. तरीही साध्वीने केलेल्या वक्तव्यावरून भाजपने तिला पक्षातून काढायला हवे होते, अशी इच्छा मुंबईतील आज उपोषण केलेल्या काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. एखादी अशी व्यक्ती जी काहीही बरळते तिला पक्षात ठेऊ नका, अशी ठाम भूमिका भाजप का घेत नाही? असा प्रश्न देखील आज उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रपिताबाबत असे वक्तव्य करणारा एखादा माथेफिरूच असू शकतो. अशा व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली आहे. काहीही तथ्ये नसलेली वक्तव्ये करण्यात प्रसिद्ध असलेल्या साध्वीवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मुंबईत उपोषण केलेल्या सामाजिक संघटनेतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, फिरोज मिठी बोरवाला, वर्षा शिंदे, नितीन मादामे, अशा अनेक समाजसेवी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Intro:साध्वी प्रज्ञाचा वक्तव्यावर मुंबईत विविध संघटनाकडून उपोषण करत भाजपने तिच्यावर मोठी कारवाई करावी अशी मागणी केली

महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते तर महात्मा गांधी देशद्रोही होते का ? असा प्रश्न मांडत मुंबईतील काही समाजसेवी संघटनांनी एकत्र येत आज एक दिवस उपोषण केले आहे .

लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे विधान केले होते.त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फोडून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे .त्यामध्येच आज मुंबईत काही संघटनांनी एकत्र येत भाजपच्या या साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याचा निषेध करत त्यावर भाजपने गांधीबद्दल अशी वक्तव्य करणार्यांवर मोठी कारवाई करावी अशी एकदिवसीय उपोषण करत मागणी करण्यात आली.

साध्वी प्रज्ञाने गांधीजीनी वर केलेल्या वक्तव्या वरून मोदींनीही आज तीव्र नाराजी व्यक्त केली साधने गांधीजींबद्दल वक्तव्य केलं त्यात अतिशय वाईट आणि चुकीचा आहे.त्याबद्दल तिने माफी मागितलेली आहे .परंतु तिला पूर्णपणे कधीच माफ करणार नाही असे मोदी यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट केलं मोदींनी आपली आपले मत स्पष्ट केले.पंरतु तरीही साध्वी ने केलेले वक्तव्यावरून भाजपने तिला पक्षातून काढायला हव होत अशी इच्छा मुंबईतील आज उपोषण केलेल्या काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. कारण एखादी अशी व्यक्ती जी काही बरळते तिला पक्षात ठेऊ नका अशी ठाम भूमिका भाजप का घेत नाही असा प्रश्न देखील आज उपोषणादरम्यान उपोषण कर्तेयांनी विचारला.

राष्ट्रपिता बाबत असं वक्तव्य हे एखादा माथेफिरू करू शकतो आणि अशा या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिलेली आहे जी व्यक्ती प्रत्येक वेळेला आपल्या काही तथ्य नसलेल्या वक्तव्यांवर प्रसिद्ध आहे. तिच्यावर कारवाई होणार अत्यंत गरजेच आहे .असं मुंबईत उपोषण केलेल्या सामाजिक संघटनेतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, फिरोज मिठी बोरवाला, वर्षा शिंदे,नितीन मादामे अशा अनेक समाजसेवी कार्यकर्त्यांनी मागणी केली.

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.