मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात युती आणि आघाडीचे पडघम वाजू लागले आहे, नवनवीन समीकरण जुळवली जात आहेत. अशातच एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनीही वंचितला सोबत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे वंचित हा केवळ शिवसेनेचा घटक पक्ष आहे आघाडीचा भाग नाही, अशी भूमिका आघाडीतील उरलेल्या दोन पक्षांची सध्या तरी आहे. त्यामुळे वंचितची महाराष्ट्रात कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वंचितकडे संशय आणि पाहिले जाते: वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडे महाराष्ट्रात सध्या संशय आणि पाहिले जात आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा हा धर्मनिरपेक्ष पक्षांपेक्षा भाजप सारख्या पक्षाला अधिक झाला. वास्तविक 2019 चा विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला राज्यात फटका बसून त्यांचा 32 जागा वर पराभव झाला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणूनच काम करीत होता. असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही वंचितला आघाडी सोबत घ्यायला तयार नाही. कारण वंचितला भाजपनेच आघाडीत पाठवून फूट पाडण्याचा अथवा पराभव घडवून आणण्याचा हा डाव असावा, असा संशय व्यक्त केला जात असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.
वंचितचा प्रभाव कमी झाल्याने राजकीय कोंडी: या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड म्हणाले की, वंचित ची राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये ताकद आहे वंचितच्या प्रभावाखाली सुमारे 11 जिल्हे येतात. या अकरा जिल्ह्यांमध्ये वंचितला बऱ्यापैकी मते मिळतात. ही मध्ये उमेदवार निवडून इतपत नसली तरी या मतांमुळे अन्य पक्षाचे उमेदवार पडतील एवढी ताकद नक्कीच आहे. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुका दरम्यान राज्यात भीमा कोरेगावचा मुद्दा ऐरणीवर होता. या मुद्द्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात चांगली मते मिळवता आली. मात्र त्यानंतर वंचितची बदलत असलेली भूमिका त्यांनी एमआयएम बरोबर केलेली युती या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वंचितला फारसा जनाधार मिळेल की नाही? याची खात्री नाही. त्यामुळे वंचितची आता राजकीय कोंडी झाली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
काय आहे वंचितची ताकद?: 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांना 80 हजाराहून अधिक मते मिळाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित चा उमेदवारांना ७.६४ टक्के मते मिळाली. तर वंचितमुळे 32 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पाच ते दहा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. या मतदार संघांमध्ये वंचितच्या उमेदवारांना दहा हजारांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत.
हेही वाचा -