मुंबई - राज्यातील लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्तवाचा निर्णय घेण्याता आला आहे. उद्यापासून (दि. 22 जून) 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आतापर्यंत राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग देण्यासाठी अठरा वर्ष वयोगटापासून पुढच्या सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता देत येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
१८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात
आतापर्यंत महाराष्ट्रात 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत होते. मात्र आता लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग देण्यासाठी अठरा वयोगटापासून पुढच्या सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरणाला मान्यता देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात उद्यापासून (दि.22 जून) १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत असून अठरा वय ते पुढील सर्व वयोगटातील नागरिकांनी आपआपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन टोपे यांनी केले.