मुंबई - मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. रविवारी दिड लाख लसीचा साठा आल्याने सोमवार ते बुधवार असे तीन दिवस लसीकरण सुरू राहणार होते. मात्र, लसीचा साठा कमी असल्याने काल १३६ पैकी 75 लसीकरण केंद्रेच सुरू ठेवण्यात आली होती. त्यात, काल 44 हजार 629 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 23 लाख 99 हजार 844 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबईत आता मोटर बाईक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत काल 44 हजार 629 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 20 हजार 271 लाभार्थ्यांना पहिला, तर 24 हजार 358 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 23 लाख 99 हजार 844 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 लाख 40 हजार 296 लाभार्थ्यांना पहिला, तर 4 लाख 59 हजार 549 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 82 हजार 554 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 23 हजार 664 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 54 हजार 393 जेष्ठ नागरिक, तर 45 ते 59 वर्षे वयोगटातील गंभीर आजार असलेल्या 8 लाख 40 हजार 233 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
आज दुसरा डोसच दिला जाणार
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा तुटवडा असल्याने 136 पैकी 75 लसीकरण केंद्रांवरच काल लसीकरण करण्यात आले. मात्र, लसीचा तुटवडा झाल्याने 20 हून अधिक केंद्रे बंद करण्यात आली. आज खासगी 73 पैकी 33 लसीकरण केंद्रांवर फक्त दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशानाकडून देण्यात आली.
लसीकरण मोहीम
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध, तसेच 45 ते 59 वर्षे वयोगटातील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटाली लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,81,554
फ्रंटलाईन वर्कर - 3,23,664
जेष्ठ नागरिक - 9,54,393
45 ते 59 वय - 8,40,233
एकूण - 23,99,844
हेही वाचा - मुंबईतील दादरमध्ये लवकरच सुरू होणार २० बेड्सचे 'कोविड एचडीयू' रुग्णालय