ETV Bharat / state

महाआघाडीच्या बैठकीत  अधिक चर्चा 'वंचित'चीच.. विधानसभेला जुळवून घेण्यासाठी होणार प्रयत्न - bjp

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते.

मुंबईत महाआघाडीची बैठक
author img

By

Published : May 28, 2019, 9:02 PM IST

मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मंगळवार २८ मे रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांना नुकसान झाल्याची सार्वत्रिक चर्चा झाली. जी चूक लोकसभेत झाली ती पुन्हा विधानसभेत होणार नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडीसह मनसेलाही सोबत घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याने सांगण्यात आले.

महाआघाडीच्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह शेकाप, पीआरपी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित हेाते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठकी होतील. विखे-पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपमध्ये जातील असे वाटत नाही, ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

समाजवादी पार्टीचे राज्य प्रमुख अबू आझमी म्हणाले की, देशात आणि राज्यातही आता सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात आता सर्वानी एकत्र आले पाहिजे. विधानसभेचे अधिवेशन लवकरच येत असून येत असून त्यात कुढल्या विषयावर चर्चा करायची यावर आजच्या बैठकीत चर्चा झाले. मात्र त्याहीसोबत राज्यात लोकसभेत झालेल्या चुका आम्ही सुधारू, आणि एकत्र कसे येऊ यावरही चर्चा झाली. यापुढे महाआघाडीत इतर पुरोगामी पक्षांना दरवाजे खुले आहेत आता पुन्हा चुका होणार नाहीत. देशाच्या अस्तित्वात्चा प्रश्न आहे, संविधान वाचविण्यासाठी आम्ही आता पुन्हा एकदा एकत्र येत आहोत. वंचित आमच्यासोबत आले तर त्यांचे आम्ही स्वागत करू, असेही आझमी म्हणाले.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा, आमदार हसन मुश्रीफ, आमदार बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, शेकापचे नेते आमदार गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार नसीम खान, बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे आमदार शरद रणपिसे, आमदार जोगेंद्र कवाडे, गवई गटाचे राजेंद्र गवई, आमदार हेमंत टकले, आमदार अनिकेत तटकरे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.

महाआघाडीच्या बैठकीत वंचितच्या धसक्याचीच अधिक चर्चा; विधानसभेला जुळवून घेण्यासाठी होणार प्रयत्न श्‍
(यासाठी  3g live 07 वरून फिड पाठवलेले असून ते घ्यावेत)
मुंबई,ता. 28 :

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांना झालेल्या नुकसानीवर सर्वाधिक चर्चा झाली. जी चूक लोकसभेत झाली ती पुन्हा विधानसभेत होणार नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडीसह मनसेलाही सोबत घेऊन त्यासाठीची मोट बांधता येईल काय, याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याने सांगण्यात आले.
महाआघाडीच्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह शेकाप, पीआरपी,समाजवादी पार्टी,  स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित हेाते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले की, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठकी होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
समाजवादी पार्टीचे राज्य प्रमुख अबू आझमी म्हणाले की, देशात आणि राज्यातही आता सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात आता सर्वानी एकत्र आले पाहिजे. विधानसभेचे अधिवेशन लवकरच येत असून  येत असून त्यात काय विषयावर चर्चा करायची यावर आजच्या बैठकीत विषय झाले. मात्र त्याही सोबत राज्यात लोकसभेत झालेल्या चुका आम्ही सुधारू, आणि एकत्र कसे येऊ यावरही चर्चा झाली. यापुढे महाआघाडीत इतर पुरोगामी पक्षांना दरवाजे खुले आहेत आता पुन्हा चुका होणार नाहीत.आता देशाच्या अस्तित्वात्चा प्रश्न आहे, संविधान वाचविण्यासाठी आम्ही आता पुन्हा एकदा एकत्र येत आहोत.वंचित आमच्यासोबत आले  तर त्यांचे आम्ही स्वागत करू असेही आझमी म्हणाले.
या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरे, सपाचे नेते आ. अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवी राणा, आमदार हसन मुश्रीफ, आ. बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, शेकापचे नेते आ. गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. नसीम खान, बविआचे आ. हितेंद्र ठाकूर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे आ. शरद रणपिसे, आ. जोगेंद्र कवाडे, गवई गटाचे राजेंद्र गवई, आ. हेमंत टकले,आ. अनिकेत तटकरे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.