ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

author img

By

Published : May 16, 2023, 4:30 PM IST

Updated : May 16, 2023, 5:22 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी (15 मे) संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नितीन गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही गडकरी यांना नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता.

Death Threat To Nitin Gadkari
Death Threat To Nitin Gadkari

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कोणीतरी फोनद्वारे ही धमकी दिली. या धमकीची माहिती गडकरींच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून लवकरच आरोपी सापडतील.

पाच महिन्यांत तिसऱ्यांदा धमकी : नितीन गडकरींना गेल्या पाच महिन्यांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यापूर्वी 14 जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या महाराष्ट्रातील नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करून धमक्या देण्यात आली होत्या. फोन करणाऱ्याने दीड तासात तीन वेळा फोन करून धमक्या देण्याबरोबरच १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. नागपूर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगावी येथील तुरुंगात धमकी देणाऱ्या कॉलरचा नंबर शोधून काढला होता. जयेश पुजारी उर्फ ​​जयेश कंठा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मार्चमध्ये पुन्हा जयेशच्या नावाने धमकी देण्यात आली होती. यानंतर 21 मार्च रोजी गडकरींना पुन्हा फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर कार्यालयातच पुन्हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतरही धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जयेश पुजारा असल्याचे सांगितले होते. गेल्या वेळी जे घडले नाही ते यावेळेस होईल, असे तो धमकी देणारा म्हणाला होता.

कोण आहे जयेश पुजारा : नागपूर पोलिसांच्या तपासानुसार, जयेश पुजारा उर्फ ​​जयेश कंठा हा कर्नाटक पोलिसांचा हिस्ट्री शीटर आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला फाशीची शिक्षा झाली आहे. सध्या तो कर्नाटकातील बेळगावी भागातील हिंडलगा कारागृहात आहे, जेथे उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असताना त्याची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. हिंडलगा कारागृहातूनच पहिल्यांदा नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात फोन करण्यात आला होता.

जयेश पुजारीने दिली होती धमकी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने पहिल्यांदा जानेवारी महिन्यात 100 कोटी आणि दुसऱ्यांदा मार्च महिन्यात फोन करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यावेळी जयेश पुजारीने बेळगाव तुरुंगातून फोन केले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्चला जयेश पुजारीला बेळगाव तुरुंगातून अटक करून नागपुरात आणले.

पुजारीचे दहशदवाद्यांशी संबंध: चौकशी दरम्यान जयेश पुजारीचा संबंध दहशतवादी आणि मोठ्या गँगस्टरसोबत असल्याचे तपासात समोर आले होते. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीवर 'युएपीए' अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृह खात्याला दिला होता. त्यानंतर केंद्रीय गृह खात्याने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी 'एनआयए'ला देण्यास संमती दिली होती. त्यामुळे 'एनआयए'ची एक चमू नागपुरात येऊन या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे लवकरच हाती घेणार अशीही माहिती होती.

जयेशच्या डायरीत सापडले होते अनेक नंबर: जयेश कांथावर कारागृहातून पळून जाण्याचा गुन्हा दाखल असून खंडणी मगितल्याचा त्याचा जुना रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा त्याने नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यासाठी धमकीचा फोन केला होता. त्यावेळी नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे एक डायरी सापडली होती. त्यात अनेक 'व्हीआयपी' लोकांचे फोन नंबर असल्याचे तपासात पुढे आले आहे आहे. आज परत गडकरींना धमकी आल्यांने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

  1. Trimbakeshwar Temple closed : त्र्यंबकेश्वर मंदिर जानेवारी महिन्यातील 'या' तारखेपर्यंत राहणार बंद
  2. Nashik Trimbakeshwar Temple: मंदिरातील पिंडीवर बर्फ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अंनिसने आवाहन
  3. Sri Kshetra Trimbakeshwar : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; चला तर मग आपणही घेऊया दर्शन..

Last Updated : May 16, 2023, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.