ETV Bharat / state

....तर ठाकरे सरकार ५ वर्ष टिकणार नाही - केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत होते. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते गप्प झालेले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लालसेमुळे आता त्यांना पवार कुटुंबीयांचं कार्य म्हणजे विकासाचे कार्य असे वाटत आहे. असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.

narayan rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे
author img

By

Published : Nov 5, 2021, 3:32 PM IST

Updated : Nov 5, 2021, 4:55 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ज्या पद्धतीने या सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेले दिसत आहेत ते पाहता हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असे नारायण राणे यांनी सांगितले आहे. मुंबईतील त्यांच्या निवस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे माध्यमांशी बोलताना

मुख्यमंत्र्यांची बारामतीत फक्त डायलॉगबाजी -

मुख्यमंत्र्यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबाचं कौतुक केलं. यावर राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत होते. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते गप्प झालेले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लालसेमुळे आता त्यांना पवार कुटुंबीयांचं कार्य म्हणजे विकासाचे कार्य असे वाटत आहे. असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेने सरकार स्थापन होण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली होती. तेच बारामतीला जाऊन पवार कुटुंबीयांचे कौतुक करतात. एक शेतकऱ्यांचा साधा प्रश्न त्यांनी उपस्थित केला नाही. शरद पवारसारखा लाचार माणूस नाही, असे सांगणारे उध्दव ठाकरे त्याच शरद पवारांकडे मुख्यमंत्री होण्यासाठी लाचार झाले. मुख्यमंत्री बारामतीला फक्त डायलॉग बाजी करून आले, अशी टीकाही नारयण राणेंनी केली.

हेही वाचा - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवार पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थितीत; शरद पवारांनी दिले उत्तर

मलिक दुसऱ्यांच्या बेडरुम मध्ये का जातात?

राष्ट्रवादीने मंत्री नवाब मलिक यांना सोडून दिले आहे. आघाडी सरकारचे मंत्री भ्रष्टाचार प्रकरणात रांगेत आहेत. एक एक करून जेलमध्ये जातील. मोदींनी कोरोनाची लस आणली नसते तर आज देशात काय अवस्था झाली असती. मात्र, कौतुक करण्याऐवजी सातत्याने मोदींवर टीका करत आहेत. आघाडी सरकारचे लक्ष एकच आहे, हात धूऊन घ्या. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक वाटेल ती बडबड करत आहेत. मुंबईतील हॉटेल ललितमध्ये काय गुपित घडले याचा नवाब मलिक गौप्यस्फोट करणार आहेत, यावर बोलताना नारायण राणे यांनी सांगितले की कुठला स्फोट करायचा तो करू द्या. मात्र, दिवाळी नंतर देवेंद्र फडणवीस मोठा बॉम्ब फोडणार आहेत. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे कुठले शर्ट घालतात, कुठले घड्याळ घालतात हे मालिकांना काय करायचे आहे? असे सांगत मलिक दुसऱ्यांच्या बेडरूम मध्ये का जातात? अशी खरमरीत टीका ही नारायण राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर केली आहे.

इंधन दरावरून राजकारण करण्यापेक्षा कपात करावी -

राज्यात व देशात झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपचा पराभव झाला म्हणून केंद्राने इंधन दरात कपात केली का? या प्रश्नावर नारायण राणे यांनी आक्षेप घेतला. इंधन दरात कपात व निवडणुकीचा संबंध काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्राने इंधन दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारने त्यात राजकारण न करता इंधन दरात थोडी कपात करावी, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

Last Updated : Nov 5, 2021, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.