ETV Bharat / state

देशासाठी हुतात्मा झालेल्यांचा अपमान करू नये, उद्धव ठाकरेंना आज आली जाग - statement

साध्वींना जे सांगायचे होते ते त्या व्यवस्थित सांगू शकत होत्या. मात्र, देशासाठी जे हुतात्मा झाले आहेत, त्यांचा अपमान कोणी करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

साध्वींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 20, 2019, 3:18 PM IST

मुंबई - वीरमरण आलेले हेमंत करकरे यांच्यावर भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि मित्रपक्ष अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्यावरुन देशभरात वादंग निर्माण झाले आहे. साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. अशात आता अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाग येऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. त्यांना जे काही सांगायचे होते ते त्या व्यवस्थित सांगू शकत होत्या. मात्र, देशासाठी जे हुतात्मा झाले आहेत, त्यांचा अपमान कोणी करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे यांनी या विषयावर संपूर्णपणे बोलणे टाळले आहे.

साध्वींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण -

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मरण आले, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. त्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. बाहेर आल्यानंतर त्यांनी भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळवली. भोपाळमधून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवणार आहेत.

Intro:मुंबई ।

शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधान भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि मित्रपक्ष अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्यावरुन देशभरात वादंग निर्माण झाले आहे. साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाग येऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Body:साध्वी प्रज्ञासिंह केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी तशी माफी मागितली आहे. त्यांना जे सांगायचं होत ते व्यवस्थित सांगू शकत होत्या. मात्र देशासाठी जे शाहिद झाले आहेत त्यांचा अपमान कोणी करू नये इतकेच उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे यांनी या विषयावर संपूर्णपणे बोलणे टाळले आहे.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे मी शाप दिला आणि त्यानंतर ते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे वादग्रस्त विधान भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका सभेत केला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह प्रमुख आरोपी आहेत. आपण आजारी असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्याच कारणामुळे तो न्यायालयाने मंजूर केला. बाहेर आल्यानंतर त्यांना भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळवली. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात त्या लढत देत आहेत.

प्रज्ञासिंह यांच्या या विधानावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. अखेर प्रज्ञासिंह यांनी माफी मागत विधान मागे घेतले होते. प्रज्ञासिंह यांना भाजपाने उमेदवारी का दिली, असा प्रश्नही विरोधक विचारत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.