ETV Bharat / state

Bawankule : उद्धव ठाकरे एकमेव मुख्यमंत्री होते, ज्यांच्या खिशाला पेन नव्हता -बावनकुळे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज रविवार (12 फेब्रुवारी)रोजी दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. या बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मिशन १५० ठरवण्यात आले असून, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे निष्क्रिय होते, याचा पाढाच वाचून दाखवला.

Bawankule vs Uddhav Thackeray
Bawankule vs Uddhav Thackeray
author img

By

Published : Feb 12, 2023, 6:04 PM IST

पत्रकार परिषद

मुंबई : महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की, त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही आणि म्हणूनच त्यांना कंटाळून त्यांचे ४० आमदार गेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रावर मारलेला शेरा दाखवा व एक हजार रुपये मिळवा असा, उपरोधिक टोलासुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी लगावला आहे.

हजारो लोक आज भाजपमध्ये येण्यास तयार : यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे निष्क्रिय होते, याचा पाढाच वाचून दाखवला. तर, देवेंद्र फडणवीस यांचे कोतूक केले आहे. फडणवीस हे असे नेतृत्व आहे की, प्रत्येक पत्रावर आदेश लिहून प्रशासनाला निर्देश देत राहतात. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व आपल्याकडे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो लोक आज भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. आपली वाट पाहत आहेत, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

खिशात पेन नाही तो मुख्यमंत्री कसा? : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार, जनता एकाच कारणाने कंटाळून गेली, की मुख्यमंत्र्याच्या खिशात पेन नाही. उद्धव ठाकरे यांच्या खिशात पेन दाखवा. ज्या मुख्यमंत्र्याच्या खिशात पेन नाही तो मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? असा प्रश्नही बावनकुळे यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना ठाकरे परिवाराने भाजप सोबत गद्दारी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या किंचित सेनेचे पदाधिकारी तर त्यांना एवढे कंटाळले आहेत की ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे कामाला लागा. असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व : प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी 2000 घरी प्रवास करणे अपेक्षित असून 500 घरी धन्यवाद मोदी, 500 घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, 500 युवा वॉरियर्स अशा स्वरुपात कामाला लागायचे आहे. येणारा काळ हा आपला आहे. वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व, निर्णय घेणारे केंद्रात आणि राज्यात सरकार यामुळे अभी नही तो कभी नही असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणि आमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अन् वादग्रस्त वक्तव्य; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.