ETV Bharat / state

Saamana Criticized On RSS And Modi: कुरुलकरांच्या बाबतीत मामला कोकाकोला सारखा थंडा पडला- सामनातून भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीकास्त्र

डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना झालेली अटक आणि देशात धार्मिक तेढ करण्याचा सुरू असलेल्या प्रयत्नावरून सामनामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जोरदार समाचार घेतला आहे. देशात राजकीय विरोधकांची बदनामी आणि त्यांच्यावर सूडबुद्धेने अटकांचे सत्र सुरू आहे. हा चिंतेचा विषय आहे, तरी हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी मोदींचे सरकार आल्यापासून अत्यंत संवेदनशील जागेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची माणसे चिटकवली आहेत. त्यांना देशाचा नकाशा बदलता येत नसला तरी संस्कृती बदलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकूणच देशाची धोरणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हातात घेतल्याची जोरदार टीकास्त्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सोडले आहे.

Saamana Newsapaper
सामना वृत्तपत्र
author img

By

Published : May 11, 2023, 10:42 AM IST

मुंबई : ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून नेहमीच विरोधकांचा समाचार घेतला जातो. डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हनीट्रॅपमध्ये अडकून पाकीस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप आहे. कुरुलकर हे डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ असून संरक्षण विषयक धोरणे ठरवणाऱ्या 10 शास्त्रज्ञांच्या समितीत राष्ट्रीय पातळीवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. कोणत्या राष्ट्राशी आपले कसे संबंध असायला हवेत, भारताचा त्या राष्ट्रांशी व्यवहार कसा असावा, या संदर्भातील संरक्षण विषयक संशोधनाची देवाण-घेवाण करावी की नाही, हे ठरवण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले होते. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

लेदर करन्सीच्या बदल्यात देशाची गुपिते : संघ परिवाराशी जुना संबंध असलेले कुरुलकर एटीएसच्या ताब्यात आहेत. कुरुलकर यांनी संघाच्या अनेक सोहळ्यात ते गणवेशात उपस्थित राहून संघाच्या व्यासपीठावरून ते संघी असल्याचे गर्वाने सांगत असायचे. राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती वगैरे बाबींवर प्रवचन करत असताना दुसरीकडे त्याचवेळी परकीय शक्तींना लेदर करन्सीच्या बदल्यात देशाची गुपिते विकत होते. कुरुलकर यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट होता. त्यावर अनेक देशात ते फिरून येत होते. ज्या देशात फिरले तेथे काय दिवे लावले, याचा तपास सुरू आहे. हेरगिरीची प्रकरणे देशाला नवीन नाहीत. परंतु कुरुलकर यांचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या माणसावर संघ विचाराचे म्हणजे देशभक्तीचे पुरेपूर संस्कार झाले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या तालमीत तयार झाले आहेत.

सामनाच्या अग्रलेखातून सवाल : संघाची पर्यायाने भाजपची त्यांना कवच कुंडले होती, हे आता उघड झाले आहे. संघ विचारांचा इतका मोठा शास्त्रज्ञ फितूर झाला, तरी त्यावर पंतप्रधान, देशाचे संरक्षण मंत्री काहीही बोलत नाही. नवाब मलिक यांचे दाऊशी संबंध असल्याची थुंकी उडवून आरोपबाजी करणाऱ्यांनी तरी कुरुलकरांच्या कारणांवर बोलायला नको काय, असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, डीआरडीओ सारख्या संवेदनशील संस्थेतला हा राष्ट्रद्रोह भाजप पचवत आहे. कारण अटक झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव अब्दुल, हुसेन, सरफराज, शेख असे नाही. ते असते तर डीआरडीओमध्ये पाकिस्तान घुसवून देशाला धोका निर्माण करण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्यावर चर्चासत्र झडली असती. भाजपचे पुढारी रस्त्यावर उतरले असते. देश पाकिस्तानींच्या हाती विकला, असे त्यांनी जाहीर केले असते. कुरुलकरांच्या बाबतीत मात्र मामला कोकाकोला सारखा थंडा पडल्याची टीका करण्यात आली आहे.

न्याय व्यवस्थाचा खेळखंडोबा : संघ परिवाराने गेल्या सात-आठ वर्षात अनेक संरक्षण, विज्ञान, कला, संस्कृती, कायदा, न्याय आणि प्रशासनात त्यांची माणसे बसवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे देखील तेच हाल आहेत. यामुळे प्रखर राष्ट्रवादी देशभक्त कुरुलकर कोणते मुखवटे लावून वावरत होते, हे सांगता येणार नाही. देशाच्या न्याय व्यवस्थाचा खेळखंडोबा याचमुळे झाला आहे. देशाची धोरणे ठरवणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या हातात आहेत. एकीकडे राजकीय विरोधकांची बदनामी आणि त्यांच्यावर सूडबुद्धेने सुरू असलेल्या अटका चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याची जागी माणसे चिटकवणे हे भाजपचे धोरण आहे. परंतु डॉ. कुरुलकर हे शेख, इब्राहिम, हुसेन असते तर थेट दाऊदशी संबंध जोडून विरोधी पक्षाला जाब विचारणारे आंदोलन झाली असती. पण डॉ. कुरुलकर यांच्याबाबतीत भाजप संघ मौनात गेले आहे. याला ढोंग म्हणतात, असा घणाघात दैनिक सामनातून करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी जमिनीचा तुकडा विकत घेतला, तर इकडे देशभक्तांनी देश विकला असा आरोप केला होता. निदान महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी तरी यावर प्रश्न विचारायला हवेत, असे आवाहन सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.

  1. हेही वाचा : Sharad Pawar News : सामनातील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
  2. हेही वाचा : Saamana Article News: गायब मुलींची धक्कादायक माहिती समोर, ठाकरे गटाची शाह-मोदींवर सडकून टीका
  3. हेही वाचा : Sharad Pawar Resignation : शरद पवारांनी राजीनामा का दिला? सामनामधून ठाकरे गटाने उपस्थित केले दोन प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.