ETV Bharat / state

Uddhav Thackeray in Budget Sessions : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल - राज्य अर्थसंकल्पीय अधिवनेशन

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे सभागृहात अनुपस्थित होते. यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून टीका करण्यात आली होती.

Uddhav Thackeray in Budget
उद्धव ठाकरे विधानभवानात दाखल
author img

By

Published : Mar 8, 2023, 5:02 PM IST

Updated : Mar 8, 2023, 5:10 PM IST

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवानात दाखल

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनात पोहोचले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन आठवडा लोटला तरी उद्धव ठाकरे सभागृहात गैरहजर राहिल्याने भाजप तसेच सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांनी दबक्या आवाजात त्यांच्यावर टीका केली होती.

पुढील रणनीती आखणार : शिवसेना हे पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाणी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानभवनात दाखल झाले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मागच्या महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात फिरकलेच नाहीत. अधिवेशनाच्या काळात कामकाजात त्यांनी सहभाग घेतला नाही, असा आरोप सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाच्या आमदारांकडून केला जात आहे.

उद्धव ठाकरे विधानभवनात : पक्षाच्या नव्याने उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या खेडमध्ये प्रचंड मोठी अशी सभा सुद्धा त्यांनी घेतली. त्याचबरोबर कसबा पोटनिवडणुकीत झालेला महाविकास आघाडीचा विजय त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे गटासाठी संजीवनी ठरला आहे. या सर्व घडामोडी पाहता रस्त्यावरील लढाई सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी पुढची रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे आज विधान भवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात सर्व विरोधी पक्षांसोबत बैठकही घेतली.

स्वागतासाठी ठाकरे गटाचे आमदार : उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील स्वागतासाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झाल्याने त्याची चर्चा सर्वत्र पसरली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ चालू होता. त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सभागृहात दाखल झाले. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून राज्यात राज्यमंत्री नसल्याने विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार? हे सुद्धा अजून गुलदस्त्यात असताना उद्याही उद्धव ठाकरे सभागृहात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले ? : महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान मंत्रालय व विधानभवनात सहसा न फिरकणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान भवनात येत असल्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे विधानभवनात येत असतील तर ह्या परिसराला आनंद होईल. ही इमारत त्यांची वाट बघते आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे सभागृहातील कामकाजात भाग घेणे जबादारीच काम आहे. पण ते आल्यावर राजकीय टोमणे मारतात की काही चांगल्या सूचना करतात या कडे आमचे पण लक्ष आहे, असा टोलाही शंभूराजे देसाई यांनी लगावला आहे.

हेही वाचा : Neelam Gore Ordered : औरंगजेबाचे उदात्तीकरण येणार अंगलट; तडीपारची कारवाई करा - सभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश

Last Updated : Mar 8, 2023, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.