ETV Bharat / state

दुचाकीची चक्क हातगाडीवरून मिरवणूकः इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे लक्षवेधी आंदोलन - Two-wheeler procession from a handcart

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी विक्रोळीत इंधन दरवाढीविरोधात अनोखं आंदोलन केलं. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. इंधन दरवाढ कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

हातगाडीवरून दुचाकीची मिरवणूक
हातगाडीवरून दुचाकीची मिरवणूक
author img

By

Published : Jan 17, 2021, 2:23 PM IST

मुंबई - सातत्यानं होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात विक्रोळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. दुचाकीची हातगाडीवरून मिरवणूक काढत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचे दर सातत्यानं वाढत आहे. वाढत्या महागाईनं सामान्य होरपळून निघत आहे. त्यामुळं केंद्रानं इंधन दरवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. सामान्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे ईशान्य मुंबई अध्यक्ष सिराज अहमद म्हणाले. विक्रोळी पार्कसाईटमध्ये हे आंदोलन करण्यात आलं. गुलाटी पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यात आलं.

हेही वाचा - धक्कादायक..! कोरोना काळात मुंबईत गुन्हेगारी वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.