मुंबई - देशात मागील सात महिन्याच्या कालावधीत कोरोनामुळे अनेक बँका, सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे व्यवहार अडचणीत सापडलेले असतानाच भारतीय पोस्ट विभागाने मात्र त्यावर मात करत नागरिकांना घरपोच आर्थिक सेवा देण्यात एक नवा विक्रम नोंदवला आहे. आपल्या पोस्टमनलाच बँकिंग सेवा देणारे दूत बनवले असून मायक्रो एटीम आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या यंत्रणेमुळे नागरिकांना घरपोच आर्थिक सेवा, त्याचे व्यवहार करण्याची सोय दिल्याने पोस्ट पुन्हा आपला विश्वास कायम करत असल्याचे दिसून आले आहे.
यामुळे आर्थिक देवाणघेवाण, त्यासाठीच्या सेवा पुरविण्यात आणि जनतेचा विश्वास मिळवण्यात मोठे यश प्राप्त केले आहे. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या हातात त्यांचा पैसा पुरविण्यापासून ते आपल्याकडे असलेल्या ग्राहकांना थेट हवे त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा देत कोरोनाच्या काळात लाखो नागरिकांना दिलासा दिला आहे. कोरोनामुळे कुरियर आणि इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांचे व्यवहार ठप्प पडले होते, परंतु या काळात पोस्टाने कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि प्रचारासाठी कोविडसाठी लागणारे औषधें, विविध प्रकारचे किट, ऑक्सिजनचे साहित्य आणि त्याचा पुरवठा आपल्या लाल रंगाच्या व्हॅन मधून गावांपासून ते शहरापर्यंत केला असल्याची माहिती मुंबई पोस्ट ऑफिसच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
जनरल पोस्ट ऑफिस मध्ये 9 ते 15 ऑक्टोबर हा सप्ताह साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या पोस्ट ऑफिसच्या स्टॅम्प दिनाच्या निमित्ताने भारतीय इतिहास भारतीय, भारतीय संस्कृती, भारताचा भूगोल आणि एकूणच विविध परंपरेने नटलेली ही भूमी आम्ही या माध्यमातून लोकांपुढे आणली आणि जगालाही या सगळ्या सर्व संस्कृती आणि भारताची ओळख पोस्टच्या तिकिटांच्या माध्यमातून मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या. पोस्टाकडून आपला वारसा सांगणाऱ्या टपाल तिकिटांचे चित्र असलेला मास्क ही काढण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - पालिकेच्या स्थायी समितीत तब्बल ६०० प्रस्ताव मंजुरीसाठी, प्रस्ताव मलईदार असल्याचा भाजपाचा आरोप
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून पोस्टाने आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे देशातील नागरिकांना लागणार्या त्या काळातील औषधे विविध साधने आमच्या लाल रंगाच्या यांच्या माध्यमातून देशभरात पोहोचवण्यात आले तब्बल सहा टन औषधांचे बुकिंग आमच्याकडे झाले तर दहा टनाहून अधिक डिलिव्हरी आम्ही पोस्टाच्या माध्यमातून दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
जे पेन्शनर्स आणि ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या घरी जाऊन त्यांचा प्रश्न सोडवला. त्यांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही त्यांना त्यांची रक्कम त्यांच्या हातात मिळवून दिली. पोस्टमनचा एटीएम म्हणून लोकांना ह्या काळात सहकार्य करत होता. म्हणून पोस्टाने या काळात खूप मोठी भूमिका बजावली. सात हजार कोटींहून अधिक ट्रांजेक्शन आमच्या पोस्टाच्या विविध यंत्रणेच्या माध्यमातून झाल्या आणि त्यामुळे शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेल्या नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाल्याचे स्वाती पांडे म्हणाल्या.
एकेकाळी पत्रव्यवहारा आणि संबंधित मुख्य सेवा देणाऱ्या पोस्टाने आज आर्थिक व्यवहारात सुद्धा विश्वास प्राप्त केला आहे. विविध योजना नागरिकांचे लाभदायक ठरत असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे आकर्षित होत आहेत. मुंबईमध्ये 229 पोस्ट ऑफिस आज सुरू असून त्या माध्यमातून सर्वच व्यवहार केले जातात. इतकेच नव्हे तर आम्ही दोन हजार पोस्टमनकडे मायक्रो एटीएमच्या माध्यमातून त्यांना पेन्शन कॅश, आयबीपीएस आधार लिंक असलेल्या विविध प्रकारच्या बँकांचे आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा नागरिकांच्या घराघरांमध्ये जाऊन उपलब्ध केली आहे. यामुळे नागरिकांना आपल्या घरांमध्ये अशा प्रकारची सेवा देत असल्याने त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईत 229 पोस्ट ऑफिस असले तरी आज 2 हजार पोस्टमॅन हे एका पोस्ट ऑफिससारखे मोठे काम करत असल्याचा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - खडसेंना राजकारण चांगले समजते, ते योग्य निर्णय घेतील - देवेंद्र फडणवीस