मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान राजगृह येथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्याद्वारे दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांकडून काही मोबाईल सीडीआरसुद्धा तपासले जात आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी राजगृह इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही सध्या पोलीस खंगाळत असून तपास योग्य दिशेने जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजगृह इमारतीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
हेही वाचा- मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे... अन् तो निघाला करोना पॉझिटिव्ह!