मुंबई : कांदिवली राइम्स अँड रम्बल या प्ले ग्रुपमधील दोन शिक्षिका जिनल छेडा आणि भक्ती शाह यांच्याविरोधात लहान मुलांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात कांदिवली पोलिसांकडून दोघींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता शुक्रवारी पुन्हा पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे.
जामिनासाठी न्यायालयात अर्ज: दोन्ही शिक्षिकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी सत्र न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर ही अटक करण्यात आली. गुरुवारी छेडा आणि शाह यांना बोरिवली येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा हजर केले गेले. प्ले ग्रुपच्या दोन वर्षीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी छेडा आणि शाह या दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहिल्यानंतर त्यात लहान मुलांना मारहाण करणे, चिमटे काढणे तसेच उचलून आपटण्याचे प्रकार उघडकीस आले होते.
पालकांकडे विचारणा केली: कांदिवली पोलिसांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदविला. त्यात प्ले ग्रुपला सप्टेंबर २०२२ पासून सुरुवात करण्यात आली. त्यात २९ विद्यार्थ्यांची नोंदणी घरातील वागण्याचा पालकांना अंदाज आला. दोन महिला शिक्षिका आणि दोन महिला इतर पालकांकडे विचारणा केली असता मदतनीस होत्या. दरम्यान लहानग्यांच्या घरातील वागण्याचा पालकांना अंदाज झाला. इतर पालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडेही हीच परिस्थिती होती.
प्ले ग्रुपमध्ये काहीतरी गडबड: चिमुकल्याच्या वडिलांना (ज्याने पोलिस तक्रार दिली होती) घरी आपल्या मुलाच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले. त्यांचे मूल आक्रमक झाले होते आणि आजूबाजूच्या इतरांना मारायचे. त्यानंतर वडिलांनी इतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चौकशी केली आणि त्यांच्यापैकी काहींनी माहिती दिली की, त्यांच्या घरीही असाच प्रकार घडत आहे. सर्व पालकांना कांदिवली प्ले ग्रुपमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी रॅम्स अँड रंबल या प्ले ग्रुपच्या मालकांशी संपर्क साधला. तेव्हा १ जानेवारी आणि २७ मार्च या कालावधीतील प्ले ग्रुपचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ज्यात छेडा आणि शाह मुलांना मारहाण करतानाचा रंगेहाथ सापडल्या.
हेही वाचा: Mumbai Crime चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका करायच्या लहानग्यांचा छळ