मुंबई - कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसल्यामुळे क्राइम पेट्रोल , सावधान इंडिया सारख्या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींनी चोरीचा गुन्हात मुंबईतील आरे पोलिसांनी अटक केलेली आहे. लॉकडाउनमुळे टीव्ही सिरीयलमध्ये काम मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून या दोघींना आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे त्यांनी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
साडे तीन लाख केले लंपास -
क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया सारख्या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्री सध्याच्या घडीला कुठल्याही प्रकारचे काम मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत. या दोघींच्या एका मित्राने आरे कॉलनीत त्याच्या घरात पेइंग गेस्ट ठेवण्यास सुरुवात केली होती. ज्या ठिकाणी या दोघी आरोपी युवती राहण्यासाठी आल्या होत्या. सदरच्या पेइंग गेस्टमध्ये राहणाऱ्या फातिमा सय्यद या महिलेचे साडे तीन लाख चोरून या दोघी घटनास्थळावरून फरार झाल्या होत्या.
५० हजार रक्कम केली हस्तगत -
याप्रकरणी पोलिसांनी सुरभी श्रीवास्तव व मोसिन शेख या दोन अभिनेत्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फुटेज व त्यांच्या मोबाईल सीडीआर व दूध त्यांचा तपास घेण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करत या दोन्ही आरोपी युवतींना अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या दोन महिला आरोपींकडून ५० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
हेही वाचा - ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणारे तिघे गजाआड, दोन अभिनेत्रींची रवानगी सुधारगृहात