ETV Bharat / state

TV actress Uorfi Javed : 'या' कारणामुळे उर्फी जावेद पूर्ण कपडे घालत नाही, जाणून व्हाल हैराण

कमी कपडे परिधान केल्याबद्दल (Uorfi wears short dress) अभिनेत्री उर्फी जावेदवर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. उर्फी जावेदला कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे. उर्फी जावेदचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये उर्फीने कमी कपडे घालण्याचे कारण सांगितले आहे. जास्त कपडे परिधान केल्याने पुरळ उठते, असे अभिनेत्रीने सांगितले आहे.

Uorfi Javed
उर्फी जावेद
author img

By

Published : Jan 7, 2023, 1:42 PM IST

Updated : Jan 7, 2023, 4:57 PM IST

मुंबई : उर्फी जावेदने (TV actress Uorfi Javed ) नुकतेच त्याच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सांगत आहे की, जेव्हा ती जास्त कपडे घालते तेव्हा तिच्या शरीराला अ‍ॅलर्जी होते. अभिनेत्री तिच्या व्हिडिओमध्ये म्हणते की, जेव्हा मी लोकरीचे किंवा पूर्ण कपडे घालते, तेव्हा मला एक प्रकारची अ‍ॅलर्जी होते. ही एक मोठी समस्या आहे. मी पूर्ण कपडे का घालत नाही, हे आता तुम्हाला कळले असेल. म्हणूनच मी इतके कमी कपडे घालते. माझ्या शरीराला कपड्याची अ‍ॅलर्जी आहे. असे तिने म्हटले आहे.

कपडे घालण्यावर आक्षेप : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतेच उर्फीला तुटपुंजे कपडे घालण्यावर आक्षेप घेतला ( allergic to clothes ) होता. पोलीसात तक्रार नोंदवून अभिनेत्रीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी उर्फीने आपल्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधत राजकारण्यांकडे दुसरा कोणताही मुद्दा नसल्याचे म्हटले (why Uorfi wears short dress) आहे.

उर्फीची आतापर्यंतची कारकीर्द : उर्फी जावेदने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'मेरी दुर्गा', 'बेहद' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या मालिकांमध्ये दिसली. उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी'मध्ये तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत (TV actress Uorfi Javed allergic to clothes) आली.

चित्रा वाघ यांची मागणी : किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या मॉडेल उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली होती. भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ही मागणी केली होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहून मॉडेल उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय : चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे त्यांचे मत मांडले. उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला स्वातंत्र्याचा हक्क इतक्या तुटपूंजे कपडे घालण्याच्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात स्त्रीच्या देहाचे अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत. याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी (Uorfi Javed) आहे.

Last Updated : Jan 7, 2023, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.