मुंबई - बहुप्रतिक्षित मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीपझ) मार्गातील भुयारीकरणाचा ३८ वा टप्पा आज पूर्ण झाला. हुतात्मा चौक ते सीएसएमटी या अप-लाइन मार्गाच्या ५५७ मीटरच्या भुयारीकरणाचा टप्पा एकूण ४०५ रिंग्जच्या सहाय्याने १४९ दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरणाटप्प्यासह पॅकेज-१मधील भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे.
सुर्या-१ ने पार पाडली कामगिरी
सूर्या-१ या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर आजच्या या भुयारीकरणामुळे मेट्रो-३ च्या एकूण सात पैकी सहा पॅकेजचे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. ऐतिहासिक वारसा इमारती नजीक भुयारीकरण करणे, हे या प्रकल्पातील अनेक आव्हानांपैकी एक होते. हे आव्हान अभियंत्यांनी आणि कामगारांनी सर्व सुरक्षेविषयक दक्षता घेत पूर्ण केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी दिली आहे. दरम्यान या कामामुळे आजपर्यंत मेट्रो 3 मधील 52 किमीच्या भुयारीकरणातील 96 टक्के पूर्ण झाल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्च गेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-१ भुयारीकरण :
१) कफ परेड ते विधान भवन (अप लाइन १२२८ मी, डाऊन लाइन १२५४ मी)
२) विधान भवन ते चर्चगेट अप लाइन ४९८ मी, डाऊन लाइन ४८१ मी )
३) चर्चगेट ते हुतात्मा चौक (अप लाइन ६५४ मी )
४) हुतात्मा चौक ते सीएसएमटीअप लाइन (अप लाइन ५५७ मी डाऊन लाइन ५६९ मी)
मेट्रो ३ : भुयारीकरणाचा ३८वा टप्पा पूर्ण - Metro Line 3
मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीपझ) मार्गातील भुयारीकरणाचा ३८ वा टप्पा आज पूर्ण झाला.