ETV Bharat / state

टीआरपी प्रकरणी पोलिसांकडून 3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल - TRP Case arnab goswami news

टीआरपी घोटाळा प्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांकडून न्यायालयात BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता सह रिपब्लिक वृत्तवाहिनीचा सीईओ विकास खान चंदनी व BARC चा रोमिल रामगडिया यांच्याविरोधात 3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. BARC चा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा दाखला व BARC च्या माजी कर्मचारी व काही केबल ऑपरेटर असे मिळून एकूण 59 जणांनी जबाब दिला आहे. पार्थो दासगुप्ता याने त्याच्या हाताने लिहून दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 2003 पासून तो अर्णव गोस्वामी यांना ओळखत आहे.

3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल
3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल
author img

By

Published : Jan 25, 2021, 11:25 AM IST

मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांकडून न्यायालयात BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता सह रिपब्लिक वृत्तवाहिनीचा सीईओ विकास खान चंदनी व BARC चा रोमिल रामगडिया यांच्याविरोधात 3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. हे अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये 12 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, पार्थो दासगुप्ता यास रिपब्लिक वृत्तवाहिनीचा संपादक अर्णव गोस्वामीकडून 12000 अमेरिकन डॉलर परदेशी ट्रीपसाठी देण्यात आले होते. याबरोबरच 40 लाख रुपये टप्प्याटप्प्याने पार्थो दासगुप्ता याला टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फॅमिली ट्रिप साठी 12000 डॉलर, 40 लाखांची रोकड
BARC चा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा दाखला व BARC च्या माजी कर्मचारी व काही केबल ऑपरेटर असे मिळून एकूण 59 जणांनी जबाब दिला आहे. पार्थो दासगुप्ता याने त्याच्या हाताने लिहून दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 2003 पासून तो अर्णव गोस्वामी यांना ओळखत आहे. टाईम्स नेटवर्कमध्ये दोघांनी एकत्र काम केले असल्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. रिपब्लिक वृत्तवाहिनी 2017 मध्ये अर्णब गोस्वामी यांनी सुरू केली होती. त्यानंतर टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी अर्णव गोस्वामी हा पार्थो दासगुप्ताच्या सतत संपर्कात होते.

पार्थ दासगुप्ता याला मुंबईतील सेंट रेजिस 6आ हॉटेलमध्ये भेटून फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या फॅमिली ट्रिपसाठी 6000 अमेरिकन डॉलर दिले होते. तर त्यानंतर पुन्हा फॅमिली ट्रिपसाठी 6000 डॉलर अर्णब गोस्वामी यांनी दिले होते. याबरोबरच 2017 आणि 2019 मध्ये टप्प्याटप्प्याने 40 लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींचा हेखेखोरपणा आडवा आला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.