ETV Bharat / state

Nadeem Akhtar Shaikh completes LLB : तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरण; आरोपी नदीमला महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये अर्ज करण्याची परवानगी

मुंबईतील 2011 मधील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नदीम अख्तर शेख याने कारागृहात असताना एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याेने आता महाराष्ट्र बार कौन्सिल सदस्यत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात केली होती. न्यायालयाने आरोपी नदीम अख्तर शेखला त्याच्या चुलत भावामार्फत महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.

author img

By

Published : Jan 16, 2023, 7:59 PM IST

Mumbai triple blasts case
तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरण

मुंबई : तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात नदीम अख्तर शेख 10 वर्षांपासून कोठडीत आहे. आरोपी नदीम अख्तर याला विशेष ट्रायल कोर्टाने महाराष्ट्र बार कौन्सिलच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना नदीमने मुंबई विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली आहे. या प्रकरणाबाबत मुंबई एटीएसने म्हटले आहे की न्यायालय आदेश देऊ शकते. न्यायालयाने याचिका स्वीकारण्यास कोणतीही हयगय नसल्याचे म्हटले आहे. विशेष न्यायाधीशांनी या प्रकरणातील आपल्या आदेशात तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नदीमला महाराष्ट्र परिषदेचे सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी नियमानुसार आवश्यक असलेला पासपोर्ट आकाराचा फोटो ॲडव्होकेट बँड आणि कोटमध्ये सादर करण्याची परवानगी दिली गेली आहे.

प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित : विशेष न्यायाधीशांनी आपल्या आदेशात पुढे म्हटले आहे की, प्राधिकरण कायदा आणि नियमांनुसार आवश्यक प्रक्रियेचे पालन करेल असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून खटला सुरू होणे बाकी आहे. या खटल्यातील अद्याप एकाही साक्षीदाराचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही आहे. तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात 26 लोकांचा मृत्यू तर 130 हून अधिक जखमी झाले होते. या आरोपींचा महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये समावेश होणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.

खटल्याच्या प्रक्रियेचे निंदनीय उल्लंघन : आरोपी नदीम अख्तर शेख याने कोर्टाला पत्र लिहिले आहे की, खटला संथगतीने चालत असल्याने हे जलद खटल्याच्या प्रक्रियेचे निंदनीय उल्लंघन आहे. आरोपींना बराच काळ तुरुंगात ठेवण्यासाठी फिर्यादी पक्षाने विलंब केल्याचा आरोप नदीम अख्तर शेख याने केला. एक दशकाहून अधिक काळ खटला प्रलंबित असल्याने नदीम अख्तर शेख याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पूर्ण दिवस खटला चालवण्याची मागणी केली आहे. दरम्यान न्यायालयाने या याचिकेवर सरकारी वकिलांना उत्तर देण्यास सांगितले आहे. ऑक्टोबरमध्ये आरोपी आणि फिर्यादी यांनी दैनंदिन सुनावणीसाठी तत्सम याचिका दाखल केली होती. ती कोर्टाने फेटाळून लावली होती.

काय आहे प्रकरण : मुंबईमध्ये 13 जुलै 2011 रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 26 जणांचा मृत्यू तर 130 जण जखमी झाले होते. जानेवारी 2012 मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा आणि हारून रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरारी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : आयकर फाइल्स क्लिअर करण्यासाठी लाच मागितली, दोघांना 3 वर्षांची कारावासाची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.