ETV Bharat / state

Work on translation : बीए, बीकॉम, बीएससी, पदवीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत अनुवादाचे काम सुरू - books from UGC into Marathi

बीए ,बीकॉम आणि बीएससी या पदवीच्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला (Translation work of BA BCom BSc degree) होता .आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रकाशन संस्था सोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रत्यक्ष अनुवादाचे काम केंद्र शासनाने सुरू केले. त्यामुळे पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आपल्या मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध केले जाणार (books from UGC into Marathi) आहेत. मात्र परवडेल अशा दरात ही पुस्तके उपलब्ध होतील असेही यूजीसीने नमूद केलेले आहे.

Work on translation
अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत अनुवादाचे काम सुरू
author img

By

Published : Dec 22, 2022, 8:49 PM IST

मुंबई : भारतीय भाषांमधून शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सहज आणि सोपे पडते. विशेषतः इंग्रजी मधून अभिव्यक्ती करत असताना विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होतो. एखादी विषय किंवा सज्ञा समजली असली तरी ती व्यक्त करताना इंग्रजीच्या भाषेचा अडसर यामुळे गुण कमी मिळण्यात होतो. मात्र विषय समजणे हे आपल्या भाषेत स्वतःची अध्ययन क्षमता वाढवण्यात होतो. गतीने विषय समजतो. (books from UGC into Marathi)

11 भाषेतून केंद्र शासनाने अनुवाद सुरू केला : त्याशिवाय जगाचे मूलभूत ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान वैद्यकीय, कला, वाणिज्य विषय ह्या सगळ्या विषयाचे पुस्तके आपल्या मराठीतून आणि त्याशिवाय इतर 11 भाषेतून केंद्र शासनाने अनुवाद सुरू केलेला आहे. नुकतेच त्या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रकाशकांसोबत बैठक करून शिक्कामोर्तब केले आणि काम सुरू झाले. (books from UGC into Marathi)

भारतीय भाषांमध्ये पदवीपूर्व इंग्रजी पाठ्यपुस्तके आणण्याबाबत चर्चा : देशातील प्रख्यात प्रकाशक न्यू एज पब्लिकेशन, महावीर पब्लिकेशन, नरोसा पब्लिकेशन, पीयर्सन, विवा बुक्स पब्लिकेशन, युनिव्हर्सिटी प्रेस, टॅक्समन त्यांच्यासोबतच प्रख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, ओरिएंट ब्लॅकस्वान आणि एल्सेव्हियरचे प्रतिनिधीही उच्चस्तरीय बैठकीत सहभागी झाले होते. UGC ने अलीकडेच वायली इंडिया, स्प्रिंगर नेचर, टेलर आणि फ्रान्सिस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया, सेंगेज इंडिया आणि मॅकग्रॉ हिल, भारत यांच्या प्रतिनिधींशी भारतीय भाषांमध्ये पदवीपूर्व इंग्रजी पाठ्यपुस्तके आणण्याबाबत चर्चा केली. यूजीसीचे अध्यक्ष प्राध्यापक जगदीश कुमार यांनी हा निर्णय आज सकाळी जाहीर केला.

सहभागी असलेली काही प्रमुख प्रकाशने : हेच लक्षात घेऊन बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी प्रकाशकांशी संलग्न आहे. (Pearson India, Narosa Publishers, Viva Books, S. Chand Publishers, Vikas Publishing, New Age Publishers, Mahavir Publications, Universities Press) आणि (Taxmann Publications) ही या प्रक्रियेत सहभागी असलेली काही प्रमुख प्रकाशने आहेत. (UGC, NEP 2020) चा एक भाग म्हणून, देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील (UG) कार्यक्रमांसाठी सर्वाधिक लोकप्रिय पाठ्यपुस्तके १२ भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्याच्या दिशेने काम करत आहे.

भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके : (UGC) चे अध्यक्ष प्रोफेसर एम. जगदेश कुमार यांनी IANS ला सांगितले की, पाठ्यपुस्तकांची ओळख, भाषांतर साधने आणि संपादन तज्ञ यांच्या संदर्भात प्रकाशकांना मदत आणि समर्थन देण्यासाठी आयोग नोडल एजन्सी म्हणून काम करेल जेणेकरून पुस्तके डिजिटल स्वरूपात परवडणारी बनवता येतील. ते पुढे म्हणाले की आयोग दोन मार्गांनी पुढे जाईल, ज्यामध्ये कार्यक्रमांची लोकप्रिय पाठ्यपुस्तके ओळखली जातील आणि अनुवादित केली जातील आणि त्याच वेळी, भारतीय लेखकांना गैर-तांत्रिक विषयांसाठी भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.