ETV Bharat / state

Transfer of six IAS officers : सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढे वगळता सर्व अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती

भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान ( Bhagyashree Banait Shirdi Sansthan transfer ) यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त ( VN Suryavanshi Additional Commissioner transfer ) आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

author img

By

Published : Nov 30, 2022, 7:50 AM IST

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई : आरोग्य विभागातील सेवा आयुक्तालयात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. आरोग्य विभागाला कडक शिस्तीचे धडे देत असतानाच, अवघ्या दोन महिन्यांत मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांची बदली केली असली, तरी त्यांना अद्याप प्रतिनियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही काळ प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.

सततच्या बदलीमुळे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे कायम चर्चेत असतात. आताही दोनच महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदावर नियुक्ती केली होती. विभागाचा पदभार स्वीकारताच त्यांनी नेहमीच्या धडाक्यात काम सुरू केले.

17 वर्षांत 19 वी मुंढेंची बदली राज्यातील विविध रुग्णालयांना धडक देत, रुग्णांची विचारपूस करताना दिल्या जात असलेल्या सेवा-सुविधांबाबत माहिती घेतली होती. तसेच डॉक्टरांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. कर्मचाऱ्यांना वेळेत येण्या-जाण्यास मुंढे यांनी आदेश दिले होते. मात्र, आरोग्य विभागातूनही त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या १७ वर्षांत मुंडे यांची तब्बल १९ वेळा बदली झाली आहे. मुंढे यांच्यासोबत इतरही काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान ( Bhagyashree Banait Shirdi Sansthan transfer ) यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त ( VN Suryavanshi Additional Commissioner transfer ) आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एस एस चव्हाण यांची ( SS Chavan transfer ) नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली करण्यात आली असून त्यांना ( Tukaram Mundhe transfer ) वेटिंगवर ठेवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.