ETV Bharat / state

टाळ मृदंगाच्या नादात तल्लीन होत मुलुंडवासियांकडून हिंदू नववर्षाचे स्वागत; महाराष्ट्र सेवा संघाचा उपक्रम - मराठी बातम्या

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडतर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी मुलुंड पूर्व परिसरात पारंपरिक दिंडी काढण्यात आली होती.

रॅलीत सहभागी मुंलुंडवासिय
author img

By

Published : Apr 7, 2019, 11:47 PM IST

मुंबई - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडतर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी मुलुंड पूर्व परिसरात पारंपरिक दिंडी काढण्यात आली. पंढरपूरच्या दिंडीप्रमाणे काढण्यात आलेल्या या दिंडीने मुलुंडकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

रॅलीत सहभागी मुंलुंडवासिय

या दिंडीवेळी टाळ मृदंगाच्या गजरात महिला आणि पुरुषांनी तल्लीन होत सहभाग नोंदविला होता. राज्यभरात गुडीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतो. हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुलुंड परिसरात अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी रांगोळी काढल्या होत्या तर विविध प्रकारच्या मोटारसायकलवर त्या स्वार झालेल्या पाहायला मिळाल्या.

ढोल ताशा आणि लेझीमच्या तालावर लहान मुले तसेच महिला आणि पुरुषांनी नृत्य सादर केले. यावेळी काही महिला पुरुष देशातील दहशतवादाच्या घटनांविरोधात एकत्र आले पाहिजे, असे फलक हातात घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते. दुसरीकडे लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करुन आपला सहभाग नोंदविला होता.

Intro:मुलुंड मध्ये टाळ मृदंग मध्ये तल्लीन होऊन हिंदू नववर्षाचे स्वागत( rutine news)plz chek

महाराष्ट्र सेवा संघ मुलुड तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी मुलुंड पूर्वेतील परिसरात पारंपारीक पंढरपूर ची दिंडीतून मुलुंडकरांचे लक्ष वेधून घेतले होते .यात टाळ मृदंगाच्या गजरात महिला, पुरुष तल्लीन होऊन विठ्ठल ,ज्ञानेश्वर गजर करीत होते. महिलांनी डोक्यावर तुळशीपत्र घेऊन शोभायात्रा मध्ये सहभाग घेतला आहे.

Body:राज्यभरात गुडीपाडव्याच्या जल्लोष पाहायला मिळतो आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागताला मुलुंड मध्ये शोभायात्रा निघाल्या आहेत. यात ठीकठिकाणी रांगोळी काढून महिलांनी विविध प्रकारच्या मोटारसायकल वर स्वार होऊन ढोल ताशा लेझीम तालावर लहान मुले महिला पुरुष आपले नृत्य सादर करण्यात व्यस्त आहेत.काही महिला पुरुष देशातील घटना आणि दहशतवाद विरुद्ध एकत्र आले पाहिजे असे हातात फलक घेऊन शोभायात्रात सहभागी झाले आहेत. लहान मुले वेगवेगळ्या वेशभूषा करून पालकांचे लक्ष वेधत आहेत. पालक आपल्या पाल्याची एक एक फोटो आपल्या मोबाईल मध्ये जमा करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.