ETV Bharat / state

Mangal Prabhat Lodha : महाबळेश्वर पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत निर्णय घेणार - पर्यटन मंत्री

महाबळेश्वर पर्यटन विभागाच्या कामावरील स्थगिती उठवण्याबाबत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा निर्णय घेणार आहेत. युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी त्यांना महाबळेश्वर पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती बाबत पत्र पाठवले होते.

Mangal Prabhat Lodha
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
author img

By

Published : Feb 9, 2023, 7:17 PM IST

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. याबाबत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती उठवण्यासंदर्भात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती.

शिंदे सरकारने दिली स्थगिती : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाबळेश्वर येथील पर्यटन स्थळ अधिक विकसित करण्यासाठी बाजारपेठ परिसरात सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या कामाला शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटन विकासाच्या कामाला खीळ बसत असल्याचा दावा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

कामांवरील स्थगिती उठवा : महाबळेश्वर येथील पर्यटन विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवून काम सुरु करण्याची मागणी शिवसेना नेते व माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलीआहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यामधील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळास चालना मिळावी, त्याचा अधिक विकास व्हावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री म्हणून अनेक बैठका देखील आपण घेतल्या आहेत.

संथगतीने होत असल्याचा आरोप : या माध्यमातून येथील मुख्य बाजारपेठ या स्थळांच्या सुशोभीकरणाचे काम सर्व प्रथम घेण्यात आले होते. परंतु मुख्य बाजारपेठेच्या सुशोभीकरणाच्या कामास स्थगिती दिल्याचे समजले आहे. तसेच पेटीत लायब्ररी काम होण्यास विविध अडथळे येऊन संथगतीने होत आहे. त्यामुळे या कामांवरिल स्थगिती उठवावी, अशी आदित्य ठाकरे यांनी लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

पर्यटन विकासाबाबत निर्णय घेणार : या संदर्भात राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांच्याकडून या संदर्भातील पत्र आपल्या कार्यालयाला प्राप्त झाले आहे. पर्यटनाच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून पर्यटन विकासाच्या दृष्टीने कुठल्याही कामाला योग्य असल्यास स्थगिती दिली जाणार नाही. त्यामुळे या कामाबाबतही लवकरच निर्णय घेऊन पर्यटन विकासाला चालना राज्य सरकार देईल. महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती लोढा यांनी दिली.

हेही वाचा - PM Narendra Modi Rajya Sabha Speech : शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.