ETV Bharat / state

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - top 10

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Top 10 @ 9 aM
Top 10 @ 9 aM
author img

By

Published : Jul 15, 2021, 7:10 AM IST

Updated : Jul 15, 2021, 9:22 AM IST

  1. मुंबई - राज्यात अद्याप डेल्टा प्लस(delta plus varient)चा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. डेल्टा प्लससंदर्भात तपासणी प्रत्येक तालुक्‍यात सुरू असून प्रत्येक तालुक्यातून शंभर नमुने तपासण्यात येत आहेत. मात्र पूर्वी आढळलेल्या एकवीस रुग्णांव्यतिरिक्त कोणताही नवीन रुग्ण राज्यांमध्ये आढळलेला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वृत्त -
  2. मुंबई - राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग उद्यापासून(15 जुलै) सुरू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत 5 जुलैला शासन निर्णय जारी केला होता. कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होणार आहेत. सविस्तर वृत्त -
  3. नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर ईडीने आता त्यांची पत्नी आरती देशमुख यांना सुद्धा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये त्यांना चौकशीच्या अनुषंगाने काही कागदपत्रांसोबत गुरुवारी मुंबई येथील कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे. पण खुद्द माजी गृहमंत्री यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्या ऐवजी ऑनलाइन माध्यमातून चौकशी करावी, असे म्हटले आहे. यामळे त्यांच्या पत्नीच्या बाबतीत सुद्धा प्रत्यक्ष हजर न राहता ऑनलाईनने विचारपूस कारावी, अशीच मागणी केली जाईल अशी काहीशी शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वृत्त -
  4. मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहे. इंधानच्या वाढत्या दरांचा परिणाम सर्वच वस्तूंच्या दरावर होतो आणि महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात सर्वकाही ठप्प असताना होत असलेली दरवाढ सर्वसामान्यांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यावरुन शिवसेनेने केंद्र सरकराला महागाईच्या वणव्यात जनतेने कसे जगायचे असा खडा सवाल केला आहे. सविस्तर वृत्त -
  5. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. तब्बल आठ महिन्यानंतर ते वाराणसी दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी वाराणसीचा दौरा केला होते. या दौऱ्यात ते 15 हजार कोटी रुपयांच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरात सायन्स सिटी मधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे, "रुद्राक्ष" आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्राचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण सध्या गरम असून मोदींच्या दौऱयाने घडामोडींचा वेग वाढला आहे. राज्यात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. सविस्तर वृत्त -
  6. मुंबई - गणेशोत्सवासासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची तुफान गर्दी लक्षात घेता, यंदा एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे, पालघर विभागामधून २ हजार २०० एसटी बसेस कोकणात सोडण्यात येणार आहे. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. सविस्तर वृत्त -
  7. मुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सविस्तर वृत्त -
  8. नवी दिल्ली - संसदीय समितीच्या बैठकीत देशाच्या संरक्षणा संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी संसदीय समितीच्या चेअरमनने मान्य केली नाही. त्यावर राहुल गांधी हे बैठकीतून बाहेर पडले. सविस्तर वृत्त -
  9. मुंबई - नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वरळी कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यातील गर्दीमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त -
  10. लखनौ - उत्तर प्रदेश पोलिसांनी अलकायदाच्या आणखी तीन दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा करण्यात येत आहे. रिपोर्टनुसार लखनौमधील वझीरगंज येथील शकील, मुझफ्फरनगरमधील मोहम्मद मुस्तक्वीम आणि लखनौमधील न्यू हैदरगंज येथील मोहम्मद मोईद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त -

Last Updated : Jul 15, 2021, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.